औरंग्याची भलामण करणाऱ्या आमदार अबू आझमींचे निलंबन

- विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होता येणार नाही

    05-Mar-2025
Total Views | 120
 
MLA Abu Asim Azmi
 
 
मुंबई :  (MLA Abu Asim Azmi Suspended  from the Maharashtra Assembly) “औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता”, असा फुत्कार काढत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानालाच आव्हान देणाऱ्या सपा आमदार अबू आझमी यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. बुधवार, दि. ५ मार्च रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे.
 
सोमवार, दि. ३ मार्चपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. मुंबईत विधानभवनाबाहेर बाहेर माध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी याचे औरंगप्रेम उफाळून आले. तो म्हणाला, “चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. मी असे मानतो, की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती. त्या काळात आपला ‘जीडीपी’ २४ टक्के इतका होता. तेव्हा भारताला ‘सोने की चिड़ियाँ’ म्हटले जायचे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती”, असा दावा त्याने केला.
 
याविरोधात मंगळवारसह बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजप, शिवसेनेसह विरोधकांनीही आझमीच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. सत्ताधारी पक्षाकडून आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत रद्द करण्याचा ठराव सभागृहात मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव सभागृहात मतास टाकून पारित केला. त्यामुळे आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121