म्हाडा नाशिक मंडळातर्फे अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

२० मार्चपर्यंत मुदतवाढ; अनामत रकमेचा २१ मार्चपर्यंत होणार स्वीकार

    10-Mar-2025
Total Views | 13

mhada



मुंबई, दि. १० : प्रतिनिधी 
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी दि. २० मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.

नाशिक मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. सुधारित वेळापत्रकानुसार अर्जदारांना दिनांक २० मार्च रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना २० मार्च रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दि. २१ मार्च रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. दि.२१ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक ०९ एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. सोडतीचा दिनांक व वेळ नंतर जाहीर केला जाणार असल्याचे आवळकंठे यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा
कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात अवैध वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने अशा अवैध वैद्यकीय व्यवसायीकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहचण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने दि. २५ जुलै २०२५ रोजी चिंचोटी नाका, कामण परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश चौहान, आर.सी.एच. अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे, पीसीपीएनडीटी अधिकारी डॉ. पूजा गुप्ता, वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास दूधमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे आणि वैद्यकीय आरोग्य विभागा..

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121