वीज मागणीच्या अंदाजासाठी एआयचा वापर , महावितरणचा फिक्की या प्रतिष्ठित संस्थेतर्फे सन्मान

Total Views | 14

मुंबई, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या उद्योजकांच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित ‘अर्बन चॅलेंज समिट अँड अर्बन इनोव्हेशन्स अवॉर्ड्स २०२५’ या पुरस्कार सोहळ्यात गुरुवार,दि.२४ रोजी नवी दिल्ली येथे महावितरणचा सन्मान करण्यात आला. महावितरणचे मुख्य अभियंता (वीज खरेदी) संदीप पाटील यांनी कंपनीतर्फे हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने ग्राहकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे. महावितरणने विकसित केलेल्या यंत्रणेमध्ये हवामान, यापूर्वीचा वीजवापर, आर्थिक घडामोडी, औद्योगिक व्यवहार, सणवार, जीवनमानातील बदल आणि सरकारची धोरणे अशा विविध घटकांचा विचार करून विजेच्या मागणीबाबत अचूक अंदाज केला जातो. वीज उत्पादन केंद्रे कधी बंद आहेत, त्यांची देखभाल कधी होणार आहे, वीज खरेदी करारांची स्थिती आणि इंधन पुरवठा या बाबींचा विचार करून विजेच्या उपलब्धतेबाबत अचूक अंदाज केला जातो. विजेच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत निश्चित करून एक दिवस आधी किंवा तातडीने वीज खरेदीसाठी रणनीती ठरविण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्सवर आधारित व्यवस्थेचा उपयोग होतो. पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदीसाठी बोली लावतानाही या व्यवस्थेचा उपयोग होतो. या व्यवस्थेमुळे महावितरणला अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी मदत होते तसेच ग्रीडचे स्थैर्य राखण्यात मदत होते.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121