सुजित मिणचेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

    28-Feb-2025
Total Views | 28

sujit minchekar join shivsena  
 
मुंबई: ( Sujit Minchekar ) धक्कापुरुषांच्या पक्षाला बसणारे हादरे कमी होण्याची चिन्हे नाहीत. कोकणपाठोपाठ आता कोल्हापुरात उबाठा गटाला मोठे खिंडार पडले असून, हातकणंगले मतदारसंघाचे माजी आ. सुजित मिणचेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय, मनसेचे हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनीही गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
 
“डॉ. सुजित मिणचेकर आणि गजानन जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असून पक्ष अधिक भक्कम होणार आहे,” असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. “लोकसभा निवडणुकीत खा. धैर्यशील माने हे विजयी झाले होते, तर विधानसभा निवडणुकीत येथे महायुतीचे दहापैकी दहा आमदार विजयी झाले. त्यानंतर असाच विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळावा, यासाठी मिणचेकर, गजानन जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी नक्की प्रयत्न करतील,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121