मुंबई : जगातील सर्वात महागड्या पण ग्राहकांची सर्वात जास्त पसंती असलेल्या फोन्समध्ये अॅपल कंपनीच्या आयफोनचा समावेश होतो. हा आयफोन आपल्याकडे असणे ही सगळ्यांचीच महत्वाकांक्षा असते. आता हीच महत्वाकांक्षा पूर्ण होणे शक्य होणार आहे, कारण आता अॅपल कंपनीकडून आतापर्यतचा सर्वात स्वस्त आयफोन लाँच करण्यात आला आहे. आयफोन १६ई हे या नवीन स्वस्त आयफोनचे नाव आहे. याची किंमत ५९,९०० रुपयांपासून सुरु होणार आहे. या फोनची प्री- बुकिंग २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून या महिनाअखेरीस म्हणजे २८ फेब्रुवारी पासून हा बाजारात उपलब्ध होणार आहे.
हा नवीन आयफोन १६ई त्याच्या सुपरफास्ट परफॉर्मन्ससाठी ए१८ चिपने युक्त असणार आहे. याचीही स्टोरेज कपॅसिटी १२८ जीबी, २५६ जीबी, ५१२ जीबी इतकी असणार आहे. त्यामुळे आयफोनचे स्टोरेज कपॅसिटीचे मुख्य वैशिषष्ट्य इथेही असणार आहे. यासोबतच हा आयफोन काळ्या आणि पांढऱ्या फिनीशिंगसह विवध आकर्षक रंगात उपलब्ध असणार आहे. हा नवीन आयफोन १६ई हा आयफोन १६ सारखीच फिचर्स असलेला, एकदम उत्तम बॅटरी लाईफ असलेला, अगदी आकर्षक २ इन १ कॅमेरा असलेला, आणि अॅपल कंपनीकडून पुरवण्यात येणारी एकदम सुरक्षा व्यवस्था असलेला असणार आहे असे अॅपल कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
या आयफोनची अजून काही आकर्षक फिचर्स म्हणजे सिरॅमिक शिल्ड असलेला सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, अगदी जलद काम करणारी ए१८ चिप, जलद सेल्युलर कनेक्टीव्हीटीसाठी आयफोनसाठी खास तयार केली गेलेली खास सी१ मोडेम सिस्टम यांचाही या नव्या आयफोनमध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे हा नवीन आयफोन ग्राहकांचे लक्ष वेधून घेणार हे नक्की.