मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट!
10-Feb-2025
Total Views | 99
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर त्यांच्यात चर्चा झाली असून ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस शिवाजी पार्क मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याआधी त्यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात आहे. यावेळी भाजप नेते मोहित कंबोज हेसुद्धा उपस्थित होते. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.