दीक्षांत समारंभात १०० धारावीकर प्रशिक्षणार्थींचा सन्मान

धारावी सोशल मिशनच्या कौशल्य विकास प्रशिक्षणात सहभाग

    17-Jan-2025
Total Views | 39
Convocation Ceremony

मुंबई : नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल)च्या सामाजिक उपक्रमण धारावी सोशल मिशन (डीएसएम) आयोजित एसी दुरुस्ती आणि किरकोळ विक्री अभ्यासक्रमांमधून १०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणार्थीना मुंबईतील जेव्हीएलआर येथील एईएमआय सभागृहात ( Convocation Ceremony ) प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हे अभ्यासक्रम धारावीतील तरुणांना उद्योगाशी संबंधित कौशल्यांनी परिपूर्ण करण्यासाठी, नवीन संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.

धारावीच्या पुनर्विकासात धारावीतील समुदायाला कौशल्य आणि रोजगारक्षम धारावी सोशल मिशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. याअंतर्गत मोफत, उद्योग-संबंधित अभ्यासक्रमांद्वारे, डीएसएमने चार कार्यक्रमांमध्ये १७५ सहभागींना प्रशिक्षण दिले आहे. यात मोबाइल रिपेअर टेक्निशियन, ब्युटी थेरपिस्ट, एसी रिपेअर टेक्निशियन आणि रिटेल सेल्स असोसिएट या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यातून १०० हून अधिक तरुणांना रोजगार मिळवला आहे, तर ५० इतरांनी स्वयंरोजगाराच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

सध्या, डीएसएमचे कौशल्य विकास उपक्रम केवळ रोजगाराबाबत नाहीत तर ते जीवन बदलण्याबाबत आहेत. धारावीकरांना व्यावहारिक कौशल्यांनी सुसज्ज करून, आम्ही एक मजबूत, स्वयंपूर्ण समुदाय निर्माण करत आहोत. हे अभ्यासक्रम आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक उन्नतीचा मार्ग मोकळा करतात. डीएसएममध्ये गॅस पाइपलाइन फिटर कोर्स सुरू आहे, ज्यामध्ये २५ सहभागी प्रशिक्षण घेत आहेत. धारावी सोशल मिशनच्या समर्पित प्रयत्नांद्वारे खरे परिवर्तन शक्य आहे, ज्यामुळे धारावीच्या उज्ज्वल, स्वावलंबी भविष्याचा मार्ग मोकळा झाला आहे.", अशी भावना प्रकल्प प्रवक्त्यांनी व्यक्त केली.

एसी दुरुस्ती अभ्यासक्रम पूर्ण करणारे धारावीतील पिला बांगला येथील मोइनुद्दीन खुर्शीद खान म्हणाले, “मला एसी दुरुस्ती आणि एसी युनिटची क्षमता कशी ठरवायची याबद्दल तांत्रिक ज्ञान मिळाले. या कोर्सने केवळ माझे कौशल्य वाढवलेच नाही तर धारावी येथील एका कंपनीत मला नोकरीची ऑफर मिळवण्यासही मदत केली."

नवाब नगर येथील रहिवासी खान अमद अहमद यानेही एसी दुरुस्तीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "मी माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार बारावी पूर्ण केल्यानंतर मोफत अभ्यासक्रमाला उपस्थित राहिलो. तीन महिन्यांच्या या कार्यक्रमात, ज्यामध्ये १५ दिवसांचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण समाविष्ट होते. इथे मला अनेक कौशल्ये शिकायला मिळाली. मला धारावीच्या एका कंपनीत आधीच नोकरी मिळाली आहे. माझा स्वतःचा एसी दुरुस्ती व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मी अनुभव घेत आहे."

गणेश विद्यामंदिर परिसरात राहणाऱ्या मनीषा धवले याने देखील या अभ्यासक्रमासाठी डीएसएमचे आभार मानत प्रतिक्रिया दिली. "या अभ्यासक्रमात मला ग्राहक सेवा आणि रिटेल ऑपरेशन्स याबाबत अद्यावत माहिती मिळाली. घर सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांना देखील या अभ्यासक्रमाचा उपयोग होऊ शकतो" अशी प्रतिक्रिया मनिषाने दिली.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121