मेट्रो मार्ग ९ आणि ७अला नवी डेडलाईन

मेट्रो सुविधेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा

    16-Jan-2025
Total Views | 24

mumbai metro


मुंबई, दि.१६ : प्रतिनिधी 
मुंबई मेट्रो मार्ग ९ (दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर) आणि मेट्रो मार्ग ७अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल) यांसाठी नव्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही मेट्रो मार्गांचे कार्यादेश दि. ९ सप्टेंबर २०१९रोजी जारी करण्यात आले होते. मात्र, विविध अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होण्यात विलंब होत आहे. त्यामुळे या मार्गांवरील नागरिकांना मेट्रो सुविधेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती माहिती अधिकारात एमएमआरडीएने दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे या प्रकल्पांबाबत माहिती विचारली होती. त्यास उत्तर देताना कार्यकारी अभियंता सचिन कोठावळे यांनी ही माहिती प्रदान केली. एमएमआरडीएची मेट्रो मार्ग ९ आणि ७अ यास नवीन मुदतवाढ दिली गेली असून मेट्रो मार्ग ९साठी जून २०२५ तर मेट्रो मार्ग ७ असाठी जुलै २०२६ अशी नवीन डेडलाईन दिली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने दिली आहे. अनिल गलगली यांच्या मते, अशा महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या विलंबाने नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध होत नाही आणि खर्चात वाढ होत असल्याने जनतेच्या कराचा पैसा वाया जातो. अशावेळी दंडात्मक कारवाई आणि कंत्राटदाराला काळया यादीत टाकणे योग्य होईल, असे मत गलगली यांनी व्यक्त केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121