चंडीगड : पंजाबमध्ये धर्मांतरणाला (Conversions) वेग आलेला आहे. अवघ्या दोन वर्षात तीन लाख ५० हजार लोकांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण करण्यात आले आहे. शहराची तुलना राज्यातील ग्रामीण भागाशी केल्यास मोठ्या प्रमाणात धर्मांतरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणात शीख अभ्यासक डॉ. रणबीर सिंग यांनी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून दावा केला आहे. २०२३-२४ या वर्षांमध्ये खेड्यातील धर्मांतरण हे झपाट्याने वाढू लागले आहे. २०२४-२५ या वर्षामध्ये तब्बल दोन लाख लोकांनी धर्मांतरण केले आहे. २०११ चा विचार केल्यास जनगणनेनुसार, पंजाबच्या एकूण २.७७ कोटी लोकसंख्येपैकी १.२६ टक्के लोकांनी ख्रिश्चन समुदायात धर्मांतरण केले होते. त्यानंतर ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण करणाऱ्यांचा आकडा ३.५० लाखांहून पार झाला आहे.
तरनतारन जिल्ह्यातील ख्रिश्चन समुदायीच लोकसंख्या २०११ मध्ये ६ हजार १३७ होती, २०१७ मध्ये १२ हजारांहून अधिक वाढली असल्याची माहिती अहवालातून आता समोर आली आहे. म्हणजेच दहा वर्षांमध्ये १०२ टक्के धर्मांतरणाचे प्रमाण वाढले आहे.
पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात या समाजाची लोकसंख्या चार लाखांहून अधिक वाढली आहे. रणबीरने सांगितले की, ख्रिस्ती धर्माच्या धर्मांतरणासाठी अमेरिका, पाकिस्तान आणि इतर देशांकडून धर्मांतरणासाठी निधी पुरवला जात आहे.
पुढे ते म्हणाले की, वेगवेगळे अमिष दाखवत धर्मांतरण करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. सर्वप्रथम, हिंदू, शीख किंवा मुस्लिम समाजातील लोकांना चर्चमध्ये आणले जाते. तसेच गरजेच्या वस्तू, शिक्षण, रोख रक्कम दिले जाईल असे अमिष दाखवून अनेकांचे धर्मांतरण करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी सांगितली होती.