श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचा

१८जानेवारीला मासिक महासत्संग

    12-Jan-2025
Total Views | 86

Shri Swami Samarth
 
नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांचा मासिक महासत्संग २५ जानेवारी ऐवजी १८ जानेवारी २०२५ रोजी श्री गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
 
परमपूज्य गुरुमाऊलींचा मासिक महासत्संग हा दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी श्री गुरुपीठ श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे होत असतो.त्याप्रमाणे जानेवारीच्या चौथ्या शनिवारी म्हणजे २५ जानेवारी २०२५ रोजी मासिक सत्संगाचे नियोजन होते. मात्र त्याच दिवशी श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे थोर संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांची वार्षिक यात्रा आहे. या यात्रेला देश विदेशातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे त्याच दिवशी गुरुपीठात मासिक महासत्संगाला येणाऱ्या हजारो सेवेकर्‍यांची गैरसोय होऊ नये आणि प्रशासनावरही ताण पडू नये याकरिता जानेवारी महिन्याचा मासिक सत्संग हा तिसऱ्या शनिवारी म्हणजे १८ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. तर रविवार दि. १९ जानेवारी रोजी वास्तुशास्त्र,याज्ञिकी, स्वरशास्त्र, अंकशास्त्र, हस्तशास्त्र, ज्योतिष या विषयांसाठी प्रशिक्षण घेतले जाणार आहे. ज्यांना या विषयांचे प्रशिक्षण घ्यायचे आहे अशा इच्छुकांनी प्रशिक्षणात अवश्य सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू; दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू; दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (जयगड) रत्नागिरी आणि मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदूर्ग रो-रो सेवा सुरू केली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रो-रो सेवेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणवासीयांना आणि पर्यटकांन..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121