मुंबई : सध्या चर्चेत असणारा कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसचा पाचवा सीझनबदद्ल प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांपेक्षा नकारात्मक प्रतिक्रियाच अधिक ऐकू येत आहेत. या सीझनमधील सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना अक्षरश: वीट आणला आहे. यातील अग्रेसर नाव म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. या दोघांचे घरातील एकूण वागणे आणि वावर पाहता भाऊच्या धक्क्यावर कार्यक्रमाचे नवे होस्ट रितेश देशमुख त्यांच्या चांगलाच खरपूस समाचार घेतील अशा तमाम मराठी प्रेक्षकांना अपेक्षा होत्या पण त्या रितेश पुर्ण करु न शकल्यामुळे कमालीची माराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, या पुर्वीच्या बिग बॉसच्या पर्वातील वेगवेगळ्या माजी सदस्यांनी महेश मांजरेकर यांच्याच होस्टींगला अधिक पसंती दिली आहे. याबद्दलच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेल्या मीनल शाह हिनं बिग बॉसच्या पाचव्या सीझनबद्दल वक्तव्य केलेलं चर्चेत आलं आहे. स्टार मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तिनं या सीझनवर भाष्य केले आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये तुफान राडे सुरू आहेत, सध्या महेश मांजरेकर असते तर चित्र वेगळं दिसलं असतं का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता, यावेळी मीनलने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. स्टार मिडिया मराठीशी बोलताना मीनल म्हणाली की," रितेश सर त्यांच्या पद्धतीनं शो होस्ट कत आहेत, ते चांगलंच करत आहेत, शोसाठाही ते चांगलं आहे. पण याशोसाठी असा होस्ट पाहिजे को बंडखोर स्पर्धकांना धडा शिकवेल, त्यांची शाळा घेईल. यासाठी महेश सर योग्य आहेत".
पुढे ती म्हणाली की, "महेश सरांनी माझा सीझन किंवा इतर सीझन होस्ट केले म्हणून मी असं म्हणत नाहीये की त्यांनाच घेतलं पाहिजे. पण अशा स्पर्धकांना सरळ करायचं असेल तर त्यांना महेश सरांसारखाच होस्ट हवा. रितेश सर त्यांच्या पद्धतीनं स्पर्धकांना चूका दाखवून देतात, समजवतात. पण ते त्यांना समजत नाही. त्यांना ओरडूनच सांगावं लागतं. माझ्यासोबतच प्रेक्षकांनाही महेश सरांच्या चावडीची आठवण येत असेल", असं वाटतं.
तसेच, तिला आता महेश मांजरेकर होस्ट असते तर त्यांनी कोणाची शाळा घेतली असती? असं विचारल्यावर मीनलनं निक्की तांबोळीचं नाव घेतलं. "आमच्या सीझनमध्ये मीरा होती. महेश सर तिची शाळा घ्यायचे. निक्की पेक्षा ती दहापटीने जास्त होती", असं ती म्हणाली. दरम्यान, या आठवड्यात जीची सर्वाधिक चर्चा आहे ती निक्की तांबोळी नॉमिनेटेड असून तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास या आठवड्यात संपणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे.