‘द युपी फाईल्स’ चित्रपटामे गाजवलं बॉक्स ऑफिस, केली कोट्यावधींची कमाई

    05-Aug-2024
Total Views | 36

the up files  
 
 
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित द युपी फाईल्स हा चित्रपट २६ जुलै रोजी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात योगी आदित्यनाथ यांची भूमिका मनोज जोशी यांनी साकारली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवरही सकारात्मक कमाई केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार द युपी फाईल्स या चित्रपटाचे बजेट २.५ कोटी होते. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी, 2.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 कोटी रुपयांची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी 4 कोटी 25 लाख रुपयांचा गल्ला या जमावला आहे.
 
दरम्यान, द युपी फाईल्स हा चित्रपट भारतात 400 पेक्षा अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनपैकी सिंगल स्क्रीनमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. तसेच, केवळ उत्तर प्रदेश मध्येच 100 पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सुरु आहे. याशिवाय अहमदाबाद, चेन्नई, उदयपूरमध्येही प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला दिसून येत आहे.
नीरज सहाय दिग्दर्शित आणि कुलदीप उमरावसिंह ओस्टवाल निर्मित या चित्रपटात मनोज जोशी यांच्यासह मंजरी फडनीस, मिलिंद गुणाजी, अवतार गिल, अली असगर, शाहबाज खान, अनिल जॉर्ज, अमन वर्मा आणि अशोक समर्थ यांच्याही महत्वपुर्ण भूमिका आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121