'फौजी’ चित्रपटात सौरभ आणि प्राजक्ताची जोडी जमली

    19-Aug-2024
Total Views | 41
 
fauji
 
 
 
मुंबई : मराठी चित्रपटामध्ये वेगळ्या विषयांसोबतच आजकाल नायक-नायिकेच्या अनोख्या जोड्याही पहायला मिळतात. चित्रपटेच्या कथेसोबत हल्ली फ्रेश जोडी ही तितकीच महत्त्वाची ठरू लागली आहे हे लक्षात घेऊनच दिग्दर्शक नव्या जोड्यांना प्राधान्य देऊ लागले आहेत. मराठी रुपेरी पडद्यावर अशीच आणखी वेगळी एक जोडी लवकरच पहायला मिळणार आहे. ती जोडी आहे सौरभ गोखले आणि प्राजक्ता गायकवाडची. ‘फौजी’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित.. घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे.
 
या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे प्रथमच एकत्र आले असून देशभक्तीची पार्श्वभूमी असलेल्या ‘फौजी’ चित्रपटात वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणं हे खरंच आम्हाला सुखावणारी बाब असल्याचे दोघं सांगतात.‘पहिल्यांदाच एकत्र काम करत असूनही आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. एकमेकांच्या भूमिका आणि त्या भूमिकांची गरज ओळखत आम्ही काम केल्यामुळे आम्ही एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकलो’ अशा भावना या दोघांनी व्यक्त केल्या.
 
आपले सैनिक हातात बंदूक घेऊन कायम आपल्या रक्षणासाठी सतत सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात, तेदेखील कोणताही स्वार्थ न ठेवता. अशा निडर सैनिकांचा जीवन प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या दोघांसोबाबत अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे,अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे हे कलाकार चित्रपटात आहेत. चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

अन्याय करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात अशी श्रध्दा आहे. शनी शिंगणापूरात कधी चोरी होत नाही म्हणून तेथील घरांना दरवाजे नाहीत. पण शनी शिंगणापूर देवस्थानातील विश्वस्तच देवाची फसवणूक करून उजळ माथ्याने मिरवत आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानात सुमारे अडीच हजार बोगस कर्मचारी दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. पूजाविधीचे बोगस अॅप तयार करून त्या माध्यमातूनही भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी विधानसभेत देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121