‘जय श्री राम’ आणि ‘जय भोलेनाथ’च्या घोषणा दिल्याने कट्टरपंथींची दगडफेक
15-Aug-2024
Total Views | 41
रांची : झारखंड जिल्ह्यातील गढवा येथे श्रावणी सोमवारचा महिना असल्य़ाने हिंदूंनी कलश यात्रेच्या मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत कलश यात्रेत भाविकांनी ‘जय श्री राम’ आणि ‘जय भोलेनाथ’च्या घोषणा दिल्याने त्यांच्यावर दगडफेक कऱण्यात आली. या कलश यात्रेत सातहून अधिक हिंदू दागवले असून घटना सोमवारी १२ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणात ४० ते ५० कट्टरपंथींविरोधात एफआरआय दाखल करण्यात आली आहे.
हे प्रकरण गढवाच्या मेरल येथील चामा गावातील आहे. श्रावण महिना हा हिंदूंसाठी पवित्र महिना मानला जातो. म्हणून झारखंड जिल्ह्यातील गढवा गावातील हिंदूंनी कलश यात्रेचे आयोजन केले होते. त्यावेळी या कलश यात्रेत महिला, मुले आणि तरूणांचाही समावेश होता. दुलदुलवा गावातून कवलश यात्रेला सुरूवात झाली होती. भाविक ‘जय श्री राम’ आणि ‘जय भोलेनाथ’च्या घोषणा देत होते. ही कलश यात्रा चामा गावातील मुस्लिम वस्तीतून जात होती. कलश यात्रा दिलदार अन्सारीच्या घराजवळ आली असता सुमारे पन्नास कट्टरपंथींनी त्यांच्यावर लाठ्या-कुऱ्हाडीने हल्ला केला.
हल्लेखोरांमध्ये दिलदार अन्सारी, लमगीर अन्सारी, परवाना अन्सारी, इम्रान अन्सारी, हबीब अन्सारी, मुन्ना अन्सारी यांच्यासह सुमारे ५० अज्ञात लोकांचा समावेश होता. घटनेप्रसंगी पोलीस घटनास्थळी तैनात झाले होते. पोलिसांनी याप्रकरणात लक्ष घालून कलश यात्रेला कोणतेही गालबोट लागू नये ही जबाबदारी पार पाडली. त्यानंतर कलश यात्रेत असणाऱ्यांनी याविरोधात पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच ठिकाणी महाशिवरात्री दिवशी भाविकांना मारहाण केल्याचा आरोप कलश यात्रेत असलेल्या भाविकांनी केला आहे.
या घटनेवर आता झारखंडचे भाजप नेते बाबुलाल मरांडी यांनी हेमंत सोरेंच्या सरकारला झापले. झारखंड सरकार हे हिंदूंसाठी मानवनिर्मीत आपत्ती निर्माण करण्याचे काम करत आहे. हेमंत सोरेंचा मतदानवर्ग हा कट्टरपंथी असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. बांगलादेशच काय तर भारतातही हिंदू असुरक्षित असल्याचा दावा बाबुलाल मरांडींनी केला आहे.
दरम्यान आता बाबुलाल मरांडी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यांनी त्यात लिहिले की, हिंदू समाज आणि हिंदू चालिरितींवर हल्ला झाल्याची ही दुसऱी घटना आहे. झारखंडमधील हिंदू समाजावरील हल्ल्यांच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हेमंत सरकारच्या आश्रयाने हे हल्ले होत आहेत. त्यांच्याच षडयंत्रातून हे केले जात आहे. हेमंत सरकारकडून हिंदूधर्मा संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा बाबुलाल मराडींनी केला आहे.