‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी, मौल्यवान वस्तूंची चोरी; म्हणाली, “माझ्या आईला अर्धांगवायूचा झटका…”

    03-Jul-2024
Total Views | 57
 
Janhavi Killekar
 
 
 
मुंबई :मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारत अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंती मिळवणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०२२ मध्ये ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यातीलच कावेरी हिच्या घरी चोरी झाली असून चोरांनी मौल्यवान वस्तुंची चोरी केली आहे.
जान्हवी किल्लेकरच्या घरी झालेल्या चोरीत चोरट्यांनी अभिनेत्रीच्या घरच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. तर, अचानक चोरी झाल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना याचा खूप मोठा धक्का बसला असून तिची आई देखील रुग्णालयात उपचार घेत असल्याचं अभिनेत्रीने यावेळी सांगितलं.
 
जान्हवी किल्लेकरने याबाबत माहिती देताना म्हटले, “नमस्कार, अचानक व्हिडीओ बनवण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे माझ्या बहुतेक चाहत्यांना आता माहितीये की, माझं पेणमध्ये एक घर आहे. लहानसा असा बंगला आम्ही अलीकडेच त्याठिकाणी बांधलाय. ते आमचं वीकेंड होम असून आम्ही फक्त शनिवार – रविवारी त्या घरी जातो. माझे आई – बाबा देखील वीकेंडला आमच्याबरोबर येतात. झालं असं की, या घरात नुकतीच चोरी झाली.”
 
पुढे ती म्हणाली, “आमच्या घरातून चोरांनी बऱ्याच मौल्यवान वस्तू जसं की स्पिकर्स, माझ्या भावाची गिटार, महागडी घड्याळं, माझ्या आईच्या साड्या अशा बऱ्याच वस्तू गेल्या. त्या चोरांना जे नेणं शक्य झालं ते चोरून घेऊन गेले. एवढंच नव्हे तर या चोरांनी एसी काढण्याचा पण प्रयत्न केला. पण, कदाचित त्यांना ते जमलं नसेल. जर तुमचंही असं बंद घर असेल किंवा कुठे असं वीकेंड होम असेल तर, प्लीज काळजी घ्या. सध्या चोरांचा खूपच सुळसुळाट झाला आहे. आपण अनेकदा खूप आवडीने गोष्टी घेतो. पण, आमच्या घरच्या अशाच काही खास वस्तू चोर घेऊन गेले. पेणचे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहेत. पण, चोर सापडतील की नाही याची शाश्वती नाही. याचं कारण म्हणजे आम्ही फक्त वीकेंडला तिथे जातो त्यामुळे नेमकी चोरी कोणत्या दिवशी झाली याची आम्हाला कल्पना नाही. माझ्या आईने या सगळ्या गोष्टींचं दडपण घेतल्यामुळे तिला अर्धांगवायूचा अटॅक (पॅरालिसिस) आला. अजूनही ती रुग्णालयात आहे. त्यामुळे तुमचंही असं बाहेर कुठे घर असेल तर काळजी घ्या.”
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121