मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी १२ जुलै २०२४ रोजी मुंबईत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला देश-विदेशातून पाहुण्यांनी हजेरी लावली होती. लग्न झाल्यानंतर १५ जुलै रोजी या नवविवाहित दाम्पत्याने जामनगरमध्ये त्यांच्या घरी गृहप्रवेश केला होता. तसेच, या सोहळ्यानंतर, अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात सर्व कर्माचाऱ्यांना आमंत्रण दिले होते. महत्त्वाचे म्हणजे, कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या परिवारालादेखील या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले होते.
अंबानी कुटुंबाने खास पद्धतीने सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले होते. मुयावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधताना त्यांनी म्हटले आहे की, “तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील हा शेवटचा कार्यक्रम आहे. पण, माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नीता अंबानींनी म्हटले आहे की, इथे असे अनेक चेहरे आहेत, जे परिचित आहेत, अंबानी कुटुंबाबरोबर वर्षानुवर्षे जोडले गेलेले आहेत. अनंत अंबानीने म्हटले की, तुम्हा सगळ्यांमुळे आमचे कुटुंब एकजूट आहे आणि तुम्ही सगळे या कुटुंबाचा भाग आहात”. तर राधिका म्हणाली की, “तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात, तुमच्याशिवाय हे सगळे अशक्य होते”.
याबरोबरच, या सोहळ्याला हजर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. एका कर्मचाऱ्याने म्हटले की, “इतक्या मोठ्या सोहळ्यात आपल्या कर्मचाऱ्यांना बोलावणे हे मोठेपणाचे लक्षण आहे. आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो”. तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने म्हटले की, “अनंतला तर आम्ही लहानपणापासून बघत आलो आहोत, त्याचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत असायला हवा, असा त्यांचा विचार असतो”.
दरम्यान, अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यात भारतीय संस्कृतीची झलक तर होतीच शिवाय ए. आर. रेहमान यांचा लाईव्ह कॉन्सर्टदेखील होता. श्रेया घोषाल, सोनू निगम, उदित नारायण, जोनिता गांधी यांनीदेखील आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केल्याचे पाहायला मिळाले होते.