"कॅम्लिन" उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन

    15-Jul-2024
Total Views | 37
camlin founder subhas dandekar passed away


मुंबई :      आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ख्यातीप्राप्त "कॅम्लीन" उद्योग समूहाचे प्रमुख, महाराष्ट्रातील ज्येष्ठ उद्योजक व "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज"चे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे दि. १५ जुलै रोजी सकाळी निधन झाले. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. कॅमलिन उद्योग समूहाचा पसारा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती.




दरम्यान, १९९० ते ९२ या काळात त्यांनी राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज"चे अध्यक्ष पद भूषवले. भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली त्या काळात निर्माण झालेल्या नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स"च्या वतीने राज्यभर व्यापारी- उद्योजकांमध्ये प्रबोधनाचे काम त्यांनी केले. या काळात त्यांनी अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती.

शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या कंपनीची गेली अनेक वर्षे धुरा वाहताना दांडेकर यांनी उत्पादनांची गुणवत्ता व मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. कॅम्लीनच्या माध्यमातून हजारो लोकांना त्यांनी रोजगार दिला.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121