या गीताचे उद्घाटन पंडीत हृदयनाथ मंगेशकर, मा. उषाताई मंगेशकर आणि आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचा भाग म्हणून 'शिवचरित्र - एक सोनेरी पान' या गीताच्या लोकार्पण प्रसंगी, पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपली बहीण भारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयीच्या आपल्या गहिऱ्या पोकळीचा अनुभव व्यक्त केला. ‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले’ या पंक्तींप्रमाणे होणारी अवस्था आज आपल्या हृदयाची आहे अशी भावना मंचावर व्यक्त केली. तसेच लतादीदींची आठवण सतत हृदयात व्यापून असते असेही सांगितले.
पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर, आशिष शेलार यांनी या गाण्याचे उद्घाटन केले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा देत म्हटले, "त्या दिवशी, ताज आणि दीदी दोघेही एकमेकांच्या सौंदर्याने प्रभावित झाले होते. दोघेही आपापल्या ठिकाणी महान होते. रात्रीच्या वेळी ताजमहलावर लतादीदींचा आवाज असा गूंजत होता, की ज्यामुळे एक मौलवी जो त्यांना आधी रागवण्यासाठी आला होता, त्यांच्या दिव्य आवाजाला ओळखून "कहीं दीप जले कहीं दिल" गाण्याची विनंती करू लागला”.
हृदयनाथ मंगेशकर यांनी जाहीर केले की ते आपल्या बहिणीच्या आठवणींवर आधारित श्री शारदा विश्व मोहिनी लता मंगेशकर नावाचे पुस्तक लिहीत आहेत.त्यांनी शिवाजी महाराजांबद्दलही बोलताना, "या महान मराठा शासकाच्या आध्यात्मिक गाभ्याचा आणि योद्धा म्हणून त्यांच्या क्षमतेचा उल्लेख केला. ' शिवचरित्र - एक सोनेरी पान ' हे गीत YouTube वरील LM मुझिक चॅनलवर पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.