शेअर बाजार अपडेट: सकाळी बाजारात प्राईज करेक्शन सुरू सेन्सेक्स निफ्टी घसरला

सेन्सेक्स १८१.८१ व निफ्टी १०६.३५ अंशाने घसरला बँक निर्देशांकात मात्र मोठी वाढ

    19-Jun-2024
Total Views | 25

Stock Market
 
मुंबई: आज सकाळच्या सत्रात अखेर प्राईज करेक्शन आले आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सकाळी ११ वाजता सेन्सेक्स १८९.८१ अंशाने घसरत ७७१०३.६० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १०६.३५ अंशाने घसरत २३४५१.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र ३३८.५९ अंशाने वाढत ५७६७७.९४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३१२.४५ अंशाने वाढत ५०७५३.३५ पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही निर्देशांकात ०.५९ व ०.६२ अंशाने वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०४ व ०.९३ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.२० व ०.९२ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices) मध्ये बहुतांश समभागात घसरण झाली आहे. निफ्टी बँक (१.२%), फायनांशियल सर्विसेस (०.६८%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.२६%), प्रायव्हेट बँक (१.१०%) या समभागात वाढ झाली असून उर्वरित ऑटो (०.६८%), आयटी (०.२०%), मिडिया (१.४२%), मेटल (१.६%), फार्मा (०.३६%), पीएसयु बँक (०.०२%), रियल्टी (२.८८%), तेल गॅस (१.१९%) या समभागात सर्वाधिक घसरण झाली आहे.
 
सकाळच्या सत्रात बीएसईत इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा, एक्सिस बँक, एसबीआय, इन्फोसिस या समभागात वाढ झाली आहे तर टायटन कंपनी, लार्सन, बजाज फायनान्स, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंटस, रिलायन्स, मारूती सुझुकी, टाटा स्टील, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, सनफार्मा, विप्रो, नेस्ले, जेएसडब्लू स्टील, एचयुएल, टीसीएस, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स या समभागात घसरण झाली आहे.
 
सकाळच्या सत्रात एनएसईत इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा, एक्सिस बँक, इन्फोसिस, एसबीआय या समभागात वाढ झाली आहे. टायटन कंपनी, कोल इंडिया, अदानी एंटरप्राईज, बीपीसीएल, लार्सन, हिंदाल्को , श्रीराम फायनान्स, ग्रासीम, अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, बजाज फायनान्स,पॉवर ग्रीड, अदानी पोर्टस,हिरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, भारती एअरटेल, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, डिवीज, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, अल्ट्राटेक सिमेंट, सिप्ला, आयशर मोटर्स, टाटा स्टील, ओएनजीसी, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, सनफार्मा, जेएसडब्लू स्टील, विप्रो, नेस्ले, एचडीएफसी लाईफ, एचयुएल, टीसीएस, टेक महिंद्रा, ब्रिटानिया, एचसीएलटेक या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले, ' बेंचमार्क निर्देशांकांनी मंगळवारी २३५७९.०५/७७३५६.७७ या नवीन सर्वकालीन उच्चांकाची नोंद केली. आश्वासक अपट्रेंड रॅलीनंतर, निफ्टी ९२ अंकांनी वर बंद झाला तर सेन्सेक्स ३०८ अंकांनी वर गेला. क्षेत्रांमध्ये, रियल्टी आणि खाजगी बँक निर्देशांकांनी चांगले प्रदर्शन केले, दोन्ही निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढले.
 
तांत्रिकदृष्ट्या, गॅप-अप ओपनिंगनंतर बाजाराने दिवसभर सकारात्मक गती राखली. दैनंदिन आणि इंट्राडे चार्टवर, ते उच्च उच्च आणि उच्च निम्न फॉर्मेशन राखत आहे, जे वर्तमान पातळीपासून पुढील अपट्रेंडला समर्थन देते. २३५००/७७००० ट्रेंड-फॉलोइंग ट्रेडर्ससाठी मुख्य समर्थन स्तर असेल. जोपर्यंत बाजार समान वर व्यवहार करत आहे तोपर्यंत तेजीची भावना कायम राहण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूला, बाजार २३६००-२३७५०/७७३००-७७८०० च्या दिशेने जाऊ शकतो. दुसरीकडे, २३५००/७७००० च्या खाली भावना बदलू शकतात आणि निर्देशांक २३३००किंवा २३२०० च्या पातळीवर घसरू शकतो.बँक-निफ्टी व्यापक बाजारपेठेला पाठिंबा देत आहे कारण FII ने भारतीय बाजारपेठेत निधी टाकण्यास सुरुवात केली आहे. तात्काळ आधारावर, ५०८०० आणि ५१८०० हे मोठे अडथळे असतील. समर्थन ५०२०० आणि ५०००० स्तरांवर अस्तित्वात आहे.'
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121