“महाराष्ट्रातले अनेकजण आपल्याच हिरोला ओळखत नाही”, चंदु चॅम्पियनमध्ये भूमिका साकारत श्रेयसने व्यक्त केली खंत
15-Jun-2024
Total Views | 41
मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन याची प्रमुख भूमिका असणारा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित झाला. भारताला पॅरालॉम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्या खऱ्या आयुष्यावर या चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता आरोह वेलणकर, अभिनेत्री हेमांगी कवी अशा काही मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. यात आणखी एका मराठी कलाकाराने भूमिका साकारली असून त्याने आपल्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या आहेत.
श्रेयसने त्याच्या इन्स्टा अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिले की, “नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चंदू चॅम्पियनमध्ये मुरलीकांत जी पेठकर यांच्या उत्तम कथेत इन्स्पेक्टर सचिन कांबळेची भूमिका साकारण्याचा मोठा सन्मान… जेव्हा @kabirkhankk भाईंनी मला ही कथा सांगितली, तेव्हा मला आश्चर्य वाटले (आणि थोडी लाज वाटली) कारण आपल्या महाराष्ट्रातले अनेकजण आपल्याच या हिरोला ओळखत नाही. या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम करण्यासाठी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.. मला कांबळे बनवल्याबद्दल आणि त्याला शोधण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल कबीर भाई धन्यवाद.
कार्तिक आर्यन तू खरा चॅम्पियन आहेस आणि चंदू उत्तम साकारल्याबद्दल तुझे अभिनंदन. बायोपिक कठीण असू शकतात... आणि याने तुझ्या मर्यादांची चाचणी घेतली पण तू दाखवून दिले की तू खूप लढाऊ आहेस जो कधीही शरण जाणार नाही. यासह तुला आणखी अनेक ब्लॉकबस्टरसाठी शुभेच्छा”.