मुंबई: सकाळच्या सत्रात सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कालच्या कंसोलिडेशनच्या घसरणीनंतर बाजारात दुपारी १२.३० पर्यंत बाजाराने उसळी घेतली आहे. शेअर बाजारात बीएसई व एनएसई समभागात मोठी वाढ झाली आहे. दुपारपर्यंत बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ४३३.३६ अंशाने वाढत ७६८९०.५६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १४१.२५ अंशाने वाढत २३४०६.१० पातळीवर पोहोचले आहे.
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.१३ व १.०१ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०२ व १.०९ टक्क्यांनी चांगली वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३०३.५५ अंशाने (०.५४%) वाढ त ५६९६२.४७ पातळीवर पोहोचला आहे तर एनएसई बँक निर्देशांक २८७.८५ अंशाने वाढत ४९९९३.६० पातळीवर (०.५८%) पोहोचला आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये एफएमसीजी (०.४५%), रिअल्टी (०.२१%) समभागात घसरण झाली असून इतर समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ तेल गॅस (१.३१%), पीएसयु बँक (१.२२%), प्रायव्हेट बँक (०.५५%), मेटल (०.२२%), हेल्थकेअर (०.७३%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.९०%), फायनांशियल सर्विसेस (०.९७%) आयटी (०.६७%) समभागा त वाढ झाली आहे.
बीएसईत सर्वाधिक वाढ ग्रावीटा (१४.९९%), इलेकोन इंजिनिअरिंग (११.६३%), डिश टिव्ही (१०.९१%), रिलायन्स पॉवर (९.९८%),किर्लोस्कर (९.४०%) तर घसरण वीए टेक वाबाग लिमिटेड (४.२०%), ब्रिगेड एंटरप्राईज (३.१९%), मारिको लिमिटेड (२.९२%), पिडिलाईट (२.६४%) अपोलो हॉस्पिटल (२.६२%) समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत सर्वाधिक वाढ कोल इंडिया (३.३२%), आयशर मोटर्स (२.३२%), पॉवर ग्रीड (२.१६%), एलटीआयएम (१.९८%),श्रीरा म फायनान्स (१.८५%) समभागात वाढ झाली आहे तर हिंदाल्को (१.३५%), ब्रिटानिया (१.३२%), टायटन (०.५४%), डिवीज (०.५३%), टाटा कनज्यूमर प्रोडक्ट (०.२७%) सर्वाधिक घसरण झाली आहे.
मुख्यतः आज शेअर बाजारात भारतातील महागाई दराची आकडेवारी जाहीर होणार असल्याने बाजारात गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे तसेच कालच्या कंसोलिडेशनच्या घसरणीनंतर आता बाजारात पुन्हा रॅलीचे सत्र सुरु होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विशेषतः रिलायन्स पॉवर समभागात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कर्जमुक्त झाल्याने बाजारा तील शेअर ९ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. बँक निर्देशांकात मोठी वाढ झाल्याने बाजारात मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये झाले ल्या वाढीला अधिक पाठिंबा मिळत निर्देशांकात वाढ झाली आहे. दुसरीकडे आज बाजारातील वर्ल्ड बँकेने भारताच्या अर्थव्यव स्थेतील केलेल्या वक्तव्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अखेरच्या सत्रात झालेली वाढ कायम राहते हे पहावे लागेल. अमेरिकन बाजारातील ग्राहक महागाई दराची आकडेवारी व फेड रल रिझर्व्ह बँकेचे निवेदन अपेक्षित असल्याने त्यांचेही बाजारात काय परिणाम होतील याची उत्सुकता बाजारात दिसत आहे.