बहुप्रतिक्षित ‘एक दोन तीन चार' चित्रपट ‘या’ दिवशी येणार भेटीला

    01-Jun-2024
Total Views | 31

marathi movie 
 
 
मुंबई : बाईपण भारी देवा आणि झिम्मा २ च्या भव्य प्रतिसादानंतर जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवी कोरा, धमाल असलेला आणि तेवढीच हृदयस्पर्शी गोष्ट असलेला ‘एक दोन तीन चार' हा नवा चित्रपट येत्या १९ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
 
या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. तरुण पिढीच्या आयुष्यात प्रेम, लग्न आणि त्यानंतर येणाऱ्या गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो याची खोचक पेरणी यात केलेली आहे.
तसंच दमदार कलाकारांची टीम ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे. वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकर यात असणार आहेत. या चित्रपटात निपुण आणि वैदेही ही जोडी पहिल्यादांच एकत्र पाहायला मिळणार आहे. आणि महत्वाचं आकर्षण म्हणजे ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीयावरचा इन्फ्लुन्सर, स्टार ‘करण सोनावणे‘ प्रथमच या चित्रपटाद्वारे मराठी सिनेमात पदार्पण करीत आहे.
या सगळ्यातील महत्त्वाचं वैशिष्टय म्हणजे ‘मुरांबा‘ या बहुचर्चित चित्रपटानंतर वरूण नार्वेकर हा हरहुन्नरी दिग्दर्शक 'एक दोन तीन चार' हा एक मजेशीर, आगळावेगळा चित्रपट घेऊन येत आहे.
 
चित्रपटाबद्दल वरुण नार्वेकर म्हणतात, ‘नुकतचं लग्न झालेल्या समीर (निपुण) आणि सायलीला (वैदेही) यांना आयुष्याकडून एक मोठं सरप्राईज मिळतं. यामुळे सुरुवातीला दोघांनाही प्रचंड आनंद होतो. पण नंतर हळूहळू त्याचं टेन्शनही जाणवायला लागतं. आता हे सरप्राईज नेमकं काय आहे ते लवकरच फिल्मच्या प्रमोशनमधून प्रेक्षकांना कळेलच! लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यात येणारा हा अनोखा ट्विस्ट बघायला सर्वांना नक्की आवडेल."
 
चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे. जिओ स्टुडिओजसोबत या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याण मधील दोन प्रमुख रस्त्यांच्या उभारणीसाठी २०१ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता !

कल्याण मधील दोन प्रमुख रस्त्यांच्या उभारणीसाठी २०१ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता !

कल्याण पूर्वेतील चेतना नाका ते नेवाळी नाका रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएने १२४.८७ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच रस्त्याच्या कामाची निविदा काढली जाणार आहे. तर कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, सिद्धार्थनगर, तीसगाव नाका हा यू टाइप रस्ता महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाकरिता एमएमएमआरडीएने ७६.८८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. रस्त्याच्या कामाचीही निविदा लवकरच काढली जाणार आहे. हा रस्ता झाल्याने कल्याण पूर्वेतील वाहतुकीला..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121