शेअर बाजार अपडेट: सुरूवातीच्या सत्रात मोठी घसरण ' कंसोलिडेशन' सुरूच सेन्सेक्स ३६७.०३ व निफ्टी ११९.८० अंशाने घसरण

मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये दोन्हींमध्ये घसरण, बँक निर्देशांकात मात्र वाढ

    30-May-2024
Total Views | 27

Stock Market
 
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सलग बाजारात तिसऱ्यांदा घसरण झाल्याने बाजारात नकारात्मकता कायम राहिली आहे. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांक ३६७.०३ अंशाने घसरत ७४१३५.८७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ११९.८० अंशाने घसरत २२५८४.९० पातळीवर पोहोचला आहे. विशेषतः सेन्सेक्स निफ्टी निर्देशांकात घसरण झाली असली तरी सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात मात्र वाढ कायम राहिली आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांकात दुपारी १ वाजेपर्यंत ३१४.६१ अंशाने वाढत बँक निर्देशांक ५५६२५.५९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांकात ३१४.१५ अंशाने वाढत ४८८१५.५० पातळीवर पोहोचला आहे. बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६२ व ०.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७७ व १.१५ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये सुरूवातीच्या सत्रात बहुतांश समभागात घसरण झाली आहे. बँक (०.६६%), मिडिया (०.५९%), पीएसयु बँक (०.२२%), प्रायव्हेट बँक (०.५८%) समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण मेटल (२.०८%), एफएमसीजी (१.०२%), आयटी (१.३२%), ऑटो (०.७६%), कनज्यूमर ड्युरेबल्स (०.९८%) या समभागात नुकसान झाले आहे.
 
बीएसईत आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाईफ, एसबीआय, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा, इंडसइंड बँक, एक्सिस बँक, एशियन पेंटस या समभागात वाढ झाली आहे तर टाटा स्टील, टायटन कंपनी,पॉवर ग्रीड, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्लू स्टील, नेस्ले, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, विप्रो, मारूती सुझुकी, एनटीपीसी, आयटीसी, एचसीएल टेक, रिलायन्स, इन्फोसिस, टाटा मोटर्स, एचयुएल, टेक महिंद्रा, लार्सन या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा, इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंटस, लार्सन, डिवीज या समभागात वाढ झाली आहे तर टाटा स्टील,पॉवर ग्रीड, बजाज फिनसर्व्ह, टायटन कंपनी, नेस्ले, श्रीराम फायनान्स,बजाज फायनान्स, जेएसडब्लू स्टील, विप्रो, आयटीसी, डॉ रेड्डीज, अपोलो हॉस्पिटल, टेक महिंद्रा, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, एम अँड एम, सिप्ला, इन्फो सिस,टाटा मोटर्स, अदानी एंटरप्राईज, सनफार्मा, ओएनजीसी, रिलायन्स, ब्रिटानिया,बीपीसीएल, बजाज ऑटो, हिंदाल्को या समभागात घसरण झाली आहे.
BSE - कुठल्या समभागात सर्वाधिक वाढ - नेटवर्क १८ मिडिया (४.२७%), ईमामी इंडिया (१६.४२%), केएनआर कन्स्ट्रक्शन (९.८८%),लिंडे इंडिया (८.५६%), आरएचआय मग्नाईस्टा इंडिया लिमिटेड (८.२२%)
NSE - कुठल्या समभागात सर्वाधिक वाढ - ईमामी (१५.६९%), केएनआर कन्स्ट्रक्शन (९.५४%), लिंडे इंडिया (८.४४%), वन ९७ ( पेटीएम) - (४.९९%), नेटवर्क १८ इंडिया (४.२४%)
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121