नवीन पटनायक यांची प्रकृती अचानक ढासळण्यामागे षडयंत्र?, तपास होणार!

पंतप्रधान मोदींची घोषणा

    29-May-2024
Total Views | 73
pm modi odisha rally


नवी दिल्ली :        ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची प्रकृति अचानक ढासळण्यामागे षडयंत्र असून याचा तपास होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यात पंतप्रधानांनी ओडिशातील मयूरभंज, बालासोर व केंद्रपारा येथे जाहीर सभांना संबोधित करताना ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नवीन पटनायक यांची प्रकृती खालावण्यामागे काही षडयंत्र आहे का? हे जाणून घेण्याचा ओडिशातील जनतेचा अधिकार आहे. नवीन बाबूच्या नावाने पडद्यामागे ओडिशात सत्ता उपभोगणाऱ्या या लॉबीचा काही सहभाग आहे का? त्याची चौकशी आवश्यक आहे. १० जूननंतर ओडिशात भाजपचे सरकार विजयी झाले तर एक विशेष समिती स्थापन करेल आणि नवीन बाबू यांची तब्येत अचानक का बिघडली, त्यांच्या प्रकृतीचे काय झाले याची चौकशी केली जाईल. सर्व वस्तुस्थिती समोर येईल”, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.


हे वाचलंत का? - पंजाब राज्य वीज कंपनी तोट्यात तरी केजरीवालांना ९०० कोटींचं कौतुक!


दरम्यान, मुख्यमंत्री नवीन पटनायक आजकाल सार्वजनिक मंचावर आरामात दिसत नाहीत, त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. माजी आयएएस अधिकारी व्हीके पांडियन हे सरकार आणि पक्षाचे सर्व काम पाहत असल्याची चर्चा आहे. नवीन पटनायक यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असून व्ही के पांडियन त्यांचे राजकीय वारसदार म्हणून समोर आले आहे.

विशेष म्हणजे ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत असून गेल्या २४ वर्षांपासून येथे बीजेडीचे सरकार आहे. नवीन पटनायक मुख्यमंत्री असून त्यांचे वडील बिजू पटनायक हे देखील ६०च्या दशकात आणि पुन्हा ९०च्या दशकात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांचे वडील एक कुशल पायलटही होते. नवीन पटनायक यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांना ओरिया भाषाही नीट येत नाही आणि त्यांना ओडिशाची भौगोलिक माहितीही नाही, पण राज्यात त्यांच्या पक्षाचा जनाधार मजबूत आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121