पंजाब राज्य वीज कंपनी तोट्यात तरी केजरीवालांना ९०० कोटींचं कौतुक!
29-May-2024
Total Views |
नवी दिल्ली : पंजाब सरकारकडून वीज कंपन्यांचे ४७७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे लपवून ठेवले आहे. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पंजाब येथील निवडणूक प्रचारात सरकारी वीज कंपनी PSPCL च्या ९०० कोटी नफ्याची कमाई ही एक उपलब्धी असल्याचे सांगत आहेत. परंतु, पंजाबमधील वास्तव काही औरच असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये आपचे सरकार आल्यानंतर सरकारी वीज कंपनीचे तब्बल ४७७५ कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. याआधी सन २०२१-२२ मध्ये १०६९ कोटी रुपयांचा नफा झाला होता. परंतु, २०२२ मध्ये आप सरकार सत्तेत येताच राज्याच्या वीज कंपनीचा तोटा जवळपास पाचपट वाढल्याचे दिसून आले आहे.
पंजाबमध्ये निवडणूक प्रचारात मोफत वीज देऊनही वीज कंपनी नफ्यात चालत आहे, हे त्यांचे यश आहे, असे केजरीवाल यांचे म्हणणे आहे. दरम्यान, पंजाबमध्ये त्यांचे सरकार येताच त्याच वीज कंपनीचे ४७७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी लपवून ठेवले. याशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या नाहीत.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, मागील सरकारच्या काळात तोट्यात चालणारी पीएसपीसीएल आता मोफत वीज देऊनही नफा कमवत आहे. आप सरकारच्या प्रामाणिक मेहनतीचे हे परिणाम आहेत. या अद्भुत कामगिरीसाठी मी पंजाबच्या ३ कोटी जनतेला आणि भगवंत मानजींना शुभेच्छा देतो.”