केजरीवालांना मोठा धक्का! मुदतवाढ नाकारली; १ जूनपर्यंतच अंतरिम जामीन!

    29-May-2024
Total Views |
kejriwal-supreme-court-registry-refuses-
 

नवी दिल्ली :      आप सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिनास मुदतवाढ देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान, जामीन मुदतवाढ मागणी करणारी याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने याचिका नाकारली आहे.


हे वाचलंत का? - 'एयुएम'मध्ये इतकी वाढ, विरोधकांनी टीका केलेल्या 'या' सरकारी कंपनीची विक्रमी घोडदौड!


दरम्यान, केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेस नकार देताना सामान्य जामीनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा पर्याय असून त्यांनी तिकडे अर्ज केला नाही. सदर याचिका मान्य नसल्याचेही रजिस्ट्रीने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनात वाढ होणार नसून सर्वोच्च न्यायालयानेही याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जामीन दि. ०१ जून रोजी संपुष्टात येणार असून त्यांना आणखी ७ दिवसांच्या मुदतवाढीसाठी याचिका दाखल केली आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या अटकेला आव्हान दिले असून सदर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. अशा स्थितीत केजरीवाल यांना आता २ जूनला कोर्टासमोर हजर राहावे लागणार आहे.