दिल्लीमध्ये ५५.३४ तर बंगालमध्ये सर्वाधिक ७८.१४ टक्के मतदान
25-May-2024
Total Views | 48
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशभरातील ५८ मतदारसंघामध्ये ५९.३३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ७८.१४ टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. त्याचप्रमाणे देशाची राजधानी दिल्लीमध्ये ५५.३८ टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यावेळी देशभरात ५९.३३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
बिहारमधील ८ मतदारसंघांमध्ये ५३.७७ टक्के, हरियाणामधील १० मतदारसंघामध्ये ५८.६७ तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील एका जागेवर ५२.४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. झारखंडमधील ४ मतदारसंघांमध्ये ६३.२० टक्के, ओडिशातील ६ जागांवर ६०.०७ टक्के, उत्तर प्रदेशातील १४ जागांवर ५४.०३ तर पश्चिम बंगालमधील ८ मतदारसंघांमध्ये ७८.१४ टक्के मतदान झाले आहे.
दिल्लीमध्ये ५५.३८ टक्के मतदान
देशाची राजधानी दिल्लीमधील सर्व सात मतदारसंघांमध्येही सहाव्या टप्प्यात मतदान झाले. यावेळी चांदणी चौक मतदारसंघात ५६.४३ टक्के, पूर्व दिल्लीत ५४.७९ टक्के, नवी दिल्लीत ५१.९८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे उत्तर पूर्व दिल्लीत ५९.०९ टक्के, उत्तर पश्चिम दिल्लीत ५३.८१ टक्के, दक्षिण दिल्लीत ५३.५३ टक्के तर पश्चिम दिल्लीमध्ये ५६.८५ टक्के मतदान झाले आहे.
ओडिशा विधानसभेचे तिसऱ्या टप्प्याचे मतदान
ओडिशा विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी १० मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यावेळी या टप्प्यात ६०.०७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.