Q4 Results: इंडीगो विमान कंपनीचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात १०६ टक्क्यांनी वाढ एकूण निव्वळ नफा १८९४.८० कोटी

कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात २५.९ टक्क्यांनी वाढ

    23-May-2024
Total Views | 40

Indigo
 
 
मुंबई: Interglobe Aviation Ltd (Indigo) कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०६ टक्क्यांनी वाढ होत निव्वळ नफा १८९४.८० कोटी रूपये झाला आहे. कंपनीने नुकताच आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. मागच्या वर्षी तिमाहीत कंपनीला ९१९.२० कोटींचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये २५.९ टक्क्यांनी वाढ होत महसूल १७८२५.२७ कोटी मिळाला आहे.
 
मागच्या वर्षी तिमाहीत कंपनीला महसूल १४१६०.६ कोटी प्राप्त झाला होता. कंपनीच्या प्रवाशांमध्ये या तिमाहीत १४.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता कंपनीचे एकूण प्रवासी ३४.८ अब्ज आहेत असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचा एकूण चलन बॅलन्स(Cash Balance) ३४७३७ कोटींवर पोहोचला आहे
 
कंपनीच्या ईबीआयटीडीएमध्ये (EBTIDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ४९ टक्क्यांनी वाढ झाल्याने एकूण ईबीआयटीडीए ४४१२ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचा करपूर्व नफा (Profit before tax) ९२ टक्क्यांनी वाढत १७७१ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचे इतर उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर ५५ टक्क्यांनी वाढ होत इतर उत्पन्न ६८० कोटींवर पोहोचले आहे तर एकूण खर्चात इयर ऑन इयर बेसिसवर २२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने कंपनीचा खर्च १६७३४ कोटींवर पोहोचला आहे.
 
यविषयी प्रतिक्रिया देताना, 'चौथ्या तिमाहीचे आर्थिक परिणाम सकारात्मक होते, ज्यामुळे FY24 मधील चारही तिमाही फायदेशीर ठरल्या. आमच्या रणनीतीच्या सशक्त अंमलबजावणीने आमच्यासाठी सातत्यपूर्ण परिणाम दिले आहेत कारण आम्ही वर्षाच्या सुरुवातीला एक संघ म्हणून आम्ही स्वतःसाठी निर्धारित केलेले लक्ष्य साध्य केले आहे,'असे इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स म्हणाले आहेत.आज कंपनीचा समभाग ४४१४.९० रुपयांवर बंद झाला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121