मुंबई : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'रामायण' चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार असून माता सीतेची भूमिका अभिनेत्री साई पल्लवी साकारणार आहे. परंतु, या दोघांचेही सेटवरील फोटो लिक झाल्यामुळै गोंधळ झाला होता. आता रामायण चित्रपटाबद्दल आणखी एक महत्वाची माहिती समोर येत असून चित्रपटाचे शुट कधीपर्यंत पुर्ण होणार आणि तो चित्रपट किती भागांमध्ये असणार याबद्दल स्पष्टता आली आहे.
रामायण या चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार असे सांगण्यात आले होते. मात्र, आता दोन भागांत चित्रपट येणार अशून दोन्ही भागांचे शुट एकाचवेळी केले जाणार आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, नितेश तिवारी याने चित्रपट आता दोन भागात रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ३५० दिवसांचे शेड्युल्ड तयार करण्यात आले आहे. या दरम्यान कलाकारांचे सोलो सिक्वेन्सचेही चित्रीकरण केले जाणार असून मुख्य चित्रीकरण २०२५ च्या डिसेंबरपर्यंत संपवण्याचा प्रयत्न असणार आहे.
‘रामायण’ चित्रपटातील रणबीर आणि साई पल्लवीच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यासरणबीर लांब केस, कानात कुंडले आणि बाजू बंद अशा लूकमध्ये दिसत असून लाई पल्लवी भरजरी साडी, सुंदर असे दागिने यात दिसत आहे. तर सांगायचा मुद्दा हा की त्यांचा हा लूक रिंपल आणि हरप्रीत या डिझायनर जोडीने डिझाईन केला असून त्यांनीच संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या चित्रपटाचेही कॉस्च्युम डिझाईन केले आहेत.
काही दिवसांपुर्वी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रिंपल आणि हरप्रीत म्हणाले होते की, त्यांनीच 'रामायण'साठी कपडे, लूक डिझाईन केला आहे. भारतीय संस्कृतीत रामायणाचं मोठं महत्व असून त्यांनी अतिशय मेहनतीने काम केले आहे.