मुंबई : मुंबईमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मतदार हा मोदींच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळे मुंबईच्या सर्वच जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होणार असल्याचा विश्वास राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवार, दि. २० मे रोजी व्यक्त केला.मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह मलबार हिल येथील मानव मंदिर हायस्कुलमध्ये मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोढा म्हमाले, देशाच्या विकासात मुंबईचा वाटा अतिशय महत्वाचा आहे, हे येथील मतदार जाणतो. त्यामुळे प्रखर उन्हात सुद्धा देशासाठी, मुंबईच्या विकासासाठी, मोदीजींच्या बाजूने मतदान करण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून मतदार राजा मोठ्या संख्येने घराबाहेर पडेल असे त्यांनी सांगितले.
देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान
देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नागरिक म्हणून लोकशाहीच्या या उत्सवात आज मतदान करून, माझा हक्क बजावला. मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, आणि सर्वजण मोदीजींना पुन्हा निवडून देण्यासाठी यामिनी जाधव यांना मतदान करत आहेत. आमच्यासाठी सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे यामिनीताई भरघोस मतांनी विजयी होतील. सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांनी रांगा लावल्या आहेत. पोलीस प्रशासन, निवडणूक अयोग अतिशय उत्तमरितीने आपले कार्य बजावत आहेत. आज याठिकाणी मुंबईकर प्रचंड ताकदीने मोदजींच्या पाठीशी उभा आहे, असेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.