नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाह मैदानात!

    02-May-2024
Total Views | 51
 
Amit Shah & Narayan Rane
 
सिंधुदुर्ग : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महायूती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभा घेणार आहेत.
 
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महायूतीच्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री अमित शाह हेदेखील नारायण राणेंचा प्रचार करणार आहेत. शुक्रवार, ३ मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? -  "आदूबाळ नाईटलाईफ प्रायव्हेट लिमिटेडच्या जाहिरातीत पॉर्नस्टार!"
 
या सभेसाठी महायूतीकडून जोरदार तयारी करण्यात आली असून रत्नागिरीतील जवाहर मैदानावर दुपारी १ वाजताच्या सुमारास ही सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अमित शाह महायूतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करणार आहेत.
 
दुसरीकडे, महाविकास आघाडीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाचे नेते आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121