मुंबई: पिरामल समुहाने बायोडील फार्मास्युटिकल प्रकल्पासाठी ११० कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. या कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट व मॅनुफॅचरिंग कंपनी आपल्या तंत्रज्ञानात नूतनीकरण आणणे तसेच मूलभूत सुविधांमध्ये भर टाकण्यासाठी समुहाकडून हा निधी गुंतवणूक करण्यात येणार आहे. पिरामल समुह यासाठी ११० कोटींची गुंतवणूक करेल असे कंपनीने अधिकृत निवेदनात सांगितले आहे.
कंपनी य गुंतवणूकीसाठी परिवर्तनीय सिक्युरिटीज (Convertible Instruments) माध्यमातून करणार आहे. पिरामल परफॉर्मिंग क्रेडिट फंड या निधीअंतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे. भारतातील नसल स्प्रे उत्पादनातील भारतातील आघाडीची कंपनी म्हणून बायोडील कडे पाहिले जाते.
पिरामल समुहाचे संचालक अनुराग कुमार यांनी, आर्थिक निधीत वाढ केल्याने उत्पादन क्षमतेत ३ वेळा वाढ होणार आहे असे म्हटले आहे. ' भावी काळात युनायटेड स्टेट्स फूड व ड्रग्स व ऍडमिनिस्ट्रेशन (USFADA) आम्हाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे आम्ही आमचा विस्तारदेखील करू असे म्हणाले आहेत.'