मुंबई इंडियन्सच्या मॅचला पोहोचला फिल्टरपाड्या बच्चन...!
08-Apr-2024
Total Views | 73
विनोदी अभिनेता गौरव मोरे याने खास मुंबई इंडियन्सच्या मॅचला हजेरी लावून त्यांना प्रोत्साहन दिले.
मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे याने थेट आयपीएलच्या मॅचला हजेरी लावली. सध्या देशभरात आयपीएलच्या (Mumbai Indians) मॅचचा फिव्हर असून गौरव मोरे मुंबई इंडियन्सच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचला. पवई फिल्टरपाड्या बच्चन गौरव मोरे याने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यात प्रवेश करत त्यांना पाठिंबा दिला.
गौरव मोरे याने मुंबई इंडियन्सच्या मॅचला लावलेली हजेरी आणि टीमला प्रोत्साहन देण्यासाठी केलेला डान्स सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. “ऐका दाजीबा…” या मराठी गाण्यावर डान्सचा खास व्हिडीओ शेअर करत गौरवने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी गौरवने मुंबई इंडियन्सची जर्सी देखील परिधान केली होती. त्याच्या या व्हिडिओवर MI च्या चाहत्यांनी भरभरुन कौतुकांना वर्षाव करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, गौरव मोरे आगामी महापरिनिर्वाण चित्रपटात महत्वपुर्म भूमिकेत दिसणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेला कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या नामदेव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून व्हटकर यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे.