बॉक्स ऑफिसच्या अपयशासाठी महिला जबाबदार? क्रिती सेनॉन म्हणते...

    08-Apr-2024
Total Views | 51
बॉक्स ऑफिसच्या अपयशानंतर महिला कलाकारांना ट्रोल केलं जातं याबद्दल क्रितीने महत्वपुर्ण भाष्य केले आहे.
 

sanon  
 
मुंबई : क्रिती सेनॉन (Kriti Sanon) सध्या ‘क्रु’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तब्बू, करिना कपूर आणि क्रिती सेनॉनची (Kriti Sanon) जमलेली भट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना फार आवडत आहे. एकही नायक नसताना या तीन नायिकांना नक्कीच हा चित्रपट उचलून धरला आहे आणि बॉक्स ऑफिसवर भक्कळ कमाई केली आहे. जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये १०० कोटींचा टप्पा या चित्रपटाने आतापर्यंत पार केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत क्रितीने (Kriti Sanon) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही तर महिला कलाकारांना जबाबदार धरलं जातं यावर भाष्य केले आहे.
 
‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत क्रिती म्हणाली, “हे खरंच खूप दु:खद आहे. काही वेळेस मी सुद्धा अशा त्रासदायक कमेंट्सना सामोरी गेले आहे. चित्रपट यशस्वी किंवा अपयशी ठरणे हे केवळ एका व्यक्तीच्या हातात नसते. त्यात पूर्ण टीमचा समावेश असतो. मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. माझं काम बोलावं, असं मला वाटतं. कारण- माझ्यासाठी यापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे. लोक पटकन या सगळ्या गोष्टीचा दोष मुलींना देतात आणि हे फक्त चित्रपटांमध्येच नाही तर काही खेळांच्या क्षेत्रातसुद्धा घडतं. टीका ही टीका असते आणि ती होतच राहते. त्यामुळे तुम्ही नेहमी त्याकडे लक्ष देऊ शकत नाही.
 
दरम्यान, क्रु चित्रपटाच्या यशानंतर क्रिती शशांक चतुर्वेदीच्या ‘दो पत्ती’ या आगामी चित्रपटात दिसणार असून तिच्यासोबत काजोल आणि तन्वी आझमी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष बाब म्हणजे क्रिती या चित्रपटाची सह-निर्मातीदेखील आहे. निर्मिती क्षेत्राच्या पदार्पणाबद्दल क्रिती म्हणाली होती,”मिमीनंतर मला असं काहीतरी करायचं होतं जे मी यापूर्वी कधीही केलं नव्हतं. मला काही काळ अशी संधी मिळत नव्हती. मला असं वाटतं की, जेव्हा तुम्हाला उत्तेजित करणारी संधी सापडत नाही, तेव्हा तुम्हाला ती संधी तयार करावी लागते. निर्मातीसह अभिनेत्री म्हणूनही ‘दो पत्ती’ हा चित्रपट माझ्यासाठी एक संधीच आहे.”
 
अग्रलेख
जरुर वाचा

'चैरेवेति चैरेवेति' मंत्राचे मूर्तिमंत उदाहरण ; प्रमिलताई मेढे

राष्ट्र सेविका समिती’च्या केंद्रीय कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय कार्यकारी, जागतिक विभाग प्रमुख, सह-कार्यवाहिका (२००३ ते २००६) आणि प्रमुख संचालिका (२००६ ते २०१२) अशा विविध जबाबदार्‍या प्रमिलताईंनी यशस्वीरित्या सांभाळल्या. त्यांनी देशभरात आणि परदेशातही प्रवास केला, ज्यात श्रीलंका, केनिया, युनायटेड किंग्डम, अमेरिका इत्यादी देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील प्रवासादरम्यान त्यांना न्यू जर्सीचे मानद नागरिकत्वही मिळाले होते. २०२० साली ‘एसएनडीटी’ विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121