म्युचल फंड गुंतवणुकीतील गैरप्रकार थांबवण्यास सेबी कडक नियम आणणार

म्युचल फंड मॅनेजमेंट कंपन्यांनाही गैरप्रकार रोखण्यास सेबीने केले आवाहन

    30-Apr-2024
Total Views | 38

SEBI
 
 
मुंबई: म्युचल फंडमधील गैरप्रकार थांबवण्यासाठी सेबीने (Securities Exchange Board of India) ने काही कडक नियमावली करण्याचे ठरवले आहे. यासाठी म्युचल फंड मॅनेजमेंट कंपन्यांना हाताशी धरत सेबीतर्फे काही संस्थात्मक निर्णय घेण्यात येऊ शकतात.वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात होणारे घोटाळे, खाजगी माहिती लीक होणे अथवा संशयास्पद व्यवहार रोखण्यासाठी सेबीने चाप लावतानाच असेट मॅनेजमेंट कंपनी (AMU) लाही या कायद्याची अंमलबजावणी करू लागू शकते.
 
काही गैरव्यवहार उघडकीस आल्यास या म्युचल फंड कंपन्यानी सेबीला यासंदर्भात माहिती देणे यात अपेक्षित असणार आहे. कुठल्याही पद्धतीचे इनसायडर ट्रेडिंग, माहितीचा गैरव्यवहार अथवा गैरवापर टाळण्यासाठी आता सेबीची करडी नजर असणार आहे. सेबीने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता अनेक कंपन्याबरोबरच गुंतवणूकदारांचे कडक मॉनेटरिंग होणार आहे. याशिवाय सेबीने वेंचर कॅपिटल कंपन्यांना आपल्या गुंतवणूकीत तरलता आणण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे वेंचर कॅपिटल फंड (VCF) गुंतवणूकीला अल्टरनेटिव इन्व्हेस्ट फंड (AIF) मध्ये परावर्तित करण्याची परवानगी दिली आहे तसा प्रस्ताव सेबीने बैठकीत मंजूर केला आहे.
 
सेबीने आपल्या बैठकीत अजून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.गिफ्ट सिटी गुजरात येथे परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची मुभा देण्यात आला आहे.देशांतर्गत गुंतवणूकदारांसोबत परदेशी गुंतवणूकदारांना गिफ्ट सिटीत गुंतवणूक करता येणार आहे.सेबीने असेही म्हटले आहे की मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी आघाडीवर चालणे आणि बाजाराचा गैरवापर रोखण्यासाठी यंत्रणा तयार केली पाहिजे
 
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121