किरण रावचा ‘लापता लेडीज’ चित्रपट आता ओटीटी गाजवण्यास सज्ज

    26-Apr-2024
Total Views | 45
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपट ११ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आणि तो आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
 

kiran rao 
 
मुंबई : ‘धोबी घाट’ या २०१० मध्ये चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळल्यानंतर ‘लापता लेडीज’ (Lapata Ladies) चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेल्या किरण रावचा हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा (Lapata Ladies) विषय हा फार वेगळा असून यात कोणताही मोठा सुपरस्टार कलाकार प्रमुख भूमिकेत नसूनही हा चित्रपच बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी तग धरु शकला.
  
१ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे बजेट ११ कोटी होते. पण बॉक्स ऑफिस कलेक्शन २०.४९ कोटी करत चित्रपटाने यश मिळवले. महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळला आहे.
 

kiran rao 
 
‘लापता लेडीज’ या चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आज २६ एप्रिल रोजी तो ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली होती. या चित्रपटात प्रतिभा रंता, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121