केंद्र सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना खेड्यापाड्यात राबवू; सुनिल तटकरे यांची ग्वाही

पाभरेमध्ये महायुतीच्या जाहीर सभेचे आयोजन

    25-Apr-2024
Total Views | 22
ुवव
 
म्हसळा : बहुजन, कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम या मतदारसंघात आम्ही केले. शिवाय केंद्र सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना खेड्यापाड्यात राबवण्याचा संकल्प केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी गुरुवार, दि. २५ एप्रिल रोजी दिली.
 
म्हसळा तालुक्यातील पाभरे येथे महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष समीर बनकर, भाजप तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले, मनसे तालुकाध्यक्ष सौरभ गोरेगावकर, आरपीआय तालुकाध्यक्ष राजेश तांबे आदींसह पाभरे गणातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तटकरे म्हणाले, अनेक पायाभूत सुविधा माझ्या मतदारसंघात उभारल्या आहेत आणि उर्वरितही लवकरच पूर्ण केल्या जातील. प्रत्येक समाजाने काम सांगायचे आणि सुनिल तटकरे यांनी काम केले नाही असे कधी झाले नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
संकटे येतात ती जातपात बघून येत नाहीत. आली तर सर्वांना फटका बसतो. रायगड मतदारसंघात आलेल्या संकटकाळात इथल्या जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. अडचणीच्या काळात इथल्या जनतेला शासनाकडून कोट्यवधी रुपयांची मदत मिळवून दिल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. आम्ही या देशाच्या संविधानाशी नेहमी एकनिष्ठ राहिलो आहोत आणि कायम राहणार आहोत परंतु लोकांच्या मनात दूषित वातावरण निर्माण करून जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र धर्मनिरपेक्ष विचार घेऊन संविधानाशी प्रामाणिक रहात काम करत असल्याची ग्वाही सुनिल तटकरे यांनी दिली.
 
दिघी बंदरामुळे मच्छिमारांना त्रास होणार नाही!
दिघी बंदर अदानी यांनी घेतले आहे; मात्र यापासून माझ्या कोळी बांधवांना जराही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला. सुषमा अंधारे यांनी अदितीवर टीका केली. माझ्या महिलांना सन्मान ज्या अदितीने राज्याचे चौथे धोरण आणून दिला. ज्या लेकीने आपल्या आईचे नाव पहिल्यांदा लावण्याचा निर्णय घेतला, हा मातृत्व सन्मान केलेल्या अदितीवर सुषमा अंधारे तुम्ही महिला म्हणून बोलता, ही गोष्ट महिलांना नक्कीच खटकणारी आहे, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121