मुंबई: सतराव्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) मधील खेळांच्या दरम्यान जाहिरातींमध्ये ५९ टक्क्यांनी वाढ असल्याचे टीएएम (TAM Report )या नव्या अहवालात म्हटले आहे. एकूण जाहिरातदारांमध्येही ३८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.एकूणच उन्हाळ्यात आयपीएल, लोकसभा निवडणूका यामुळे कंपन्या, ब्रँड ग्राहकांच्या दृष्टीक्षेपात येण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या जाहीरातीवरील खर्चात वाढ करताना दिसत आहेत. मागील आयपीएलमध्ये जाहिरातीत ३७ टक्यांने वाढ व जाहिरातदारात ३८ टक्क्यांनी वाढ झाली होती.
अहवालात म्हटल्याप्रमाणे, Ecom Gaming या क्षेत्रातील सर्वाधिक जाहिरात यंदा आयपीएलदरम्यान वाढल्या आहेत. कंपनीच्या अँड वोल्युममध्ये यावर्षी १८ टक्क्याने वाढ झाली आहे. विशेषतः फूड व बेवरेज (अन्न व शीतपेये) सेक्टरमध्ये जाहिरातीत मोठी वाढ झाली आहे. पान मसाला जाहिरातीतही विशेष वाढ झाली आहे. या प्रमुख क्षेत्रातील जाहिरातींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना जाहिरातदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत झालेल्या ३१ सामन्यात इ कॉमर्स गेमिंग व पान मसाला जाहिराती सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या आहेत. १६ सामन्यातील सर्वेक्षणात स्पोरटा टेक्नॉलॉजी (Dream 11) जाहिराती आघाडीच्या ठरल्या आहेत.
सर्वाधिक जाहिरातदारांमध्ये पार्ले प्रोडक्टचा नंबर लागला आहे. यामध्ये पार्ले प्रोडक्ट जाहिरातीत ११ टक्के वाटा दर्शविला आहे. त्यानंतर स्पोरटा टेक्नॉलॉजी (Dream 11) चा नंबर लागून १० टक्के वाटा या कंपनीचा आहे.एकूण जाहिरातदारांपैकी ३७ टक्के वाटा या पाच कंपन्याचा ठरला आहे.सतराव्या आयपीएलमध्ये नव्या ३७ जाहिरात प्रवर्ग तयार झाले. सतराव्या आयपीएलमध्ये एकूण ९४ ब्रँड्सने एकूण जाहिराती केल्या आहेत.पार्लेनंतर क्रमांक दोन ग्रो कंपनीने पटकावला आहे.