मुंबई: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज सेन्सेक्स व निफ्टीत घसरण झाली आहे. आज इस्त्राईलने सकाळी इराणवर प्रत्युत्तर म्हणून क्षेपणास्त्राने हल्ला केला. परिणामी आज सकाळी गिफ्ट निफ्टीतही घसरण झाली होती.गिफ्ट निफ्टी ३५० अंशाने घसरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड दरात ९० डॉलर्स बँरेल किंमत पोहोचली आहे.
आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३३९ .४५ अंशाने घसरत ७२१३०.१२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी १२०.५० अंशाने घसरत २१८७५.३५ पातळीवर पोहोचला आहे.दोन्ही सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात घट झाली आहे.बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.४३ व ०.९४ टक्क्यांनी घट झाली आहे.निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.४५ व १.१० टक्क्यांनी घट झाली आहे.
बीएसईत आयटीसी,एम अँड एम,एचडीएफसी,भारती एअरटेल,एचयुएल,विप्रो समभागात वाढ झाली असून टाटा मोटर्स एक्सिस बँक, लार्सन, एनटीपीसी, एचसीएलटेक, इन्फोसिस, इंडसइंड बँक, टीसीएस, नेस्ले , टाटा स्टील रिलायन्स, एसबीआय या समभागात घट झाली आहे.
एनएसईत ग्रासीम,आयटीसी, भारती एअरटेल,अपोलो हॉस्पिटल,भारती एअरटेल,आयसीआयसीआय बँक,ओएनजीसी, सिप्ला, विप्रो या समभागात आज वाढ झाली आहे. एनएसईत बजाज ऑटो, एक्सिस बँक,टाटा मोटर्स,एनटीपीसी,टाटा कनज्यूमर, श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, आयशर मोटर्स, एसबीआय लाईफ, टाटा स्टील या समभागात आज सकाळी गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात पीएसयु बँक, रियल्टी, मिडिया,ऑटो समभागात सर्वाधिक नुकसान झाले आहे तर केवळ एफएमसीजी कंपन्यांच्या समभागात आज लाभ होताना दिसत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव वाढल्याने व क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने आज देशांतर्गत व परदेशी गुंतवणूकदार भारतीय व आशियाई बाजारात कसे प्रतिसाद देतील ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.