‘बाईपण’नंतर आता ‘आईपण भारी देवा!’

    08-Mar-2024
Total Views | 39
बाईपण भारी देवा' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदेची जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केली नवीन चित्रपटाची घोषणा ‘आईपण भारी देवा!’
 

baipan bhari deva 
 
मुंबई : मराठी चित्रपटांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांना जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने आगामी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. २०२३ या वर्षात हिंदी चित्रपटांना टक्कर देत बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ने (Baipan Bhari Deva) ९० कोटींचा टप्पा गाठला. आता केदार शिंदे पुन्हा एकदा स्त्रीयांचीच गोष्ट मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहेत पण यावेळी ती फक्त आईची कथा असणार आहे.
 
केदार शिंदे यांनी ‘आईपण भारी देवा’ या नव्या चित्रपटाची घोषणा महिला दिनाच्या दिवशी केली आहे. आता कलाकर कोण असणार, काय कथा असणार याची अद्याप माहिती समोर आली नसली तरी पुन्हा एकदा स्त्रीयांना त्यांच्या हक्काचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार यात शंका नाही. या चित्रपटासाठी पुन्हा एकदा केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज एकत्र येणार आहेत.
 
हे वाचलंत का? - 'बाईपण भारी देवा' हे आमचे बाळ, केदार शिंदे झाले भावूक!  
 
चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, "बाईपण भारी देवा या सिनेमाने खुप काही शिकवलं. खरतर प्रत्येक कलाकृती आम्हा कलाकारांसाठी एक कार्यशाळा असते. पण बाईपण सिनेमा करताना आणि नंतर प्रदर्शित झाल्यावर रसिकांच्या प्रतिसादाने भारावलेपण आलं होतं. ही कलाकृती मी माझ्या आई, बायको, मुलगी, मावशी, आजी... यांच्यासाठीच केली होती. अगं बाई अरेच्चा ने स्त्रीच्या मनात काय चालतं? याचा शोध घेतला, बाईपणने स्त्री मनाला समजून घेण्याची संधी मिळाली. यशाने जबाबदारी वाढली. मग डोक्यात एक आलं.. आईपण किती महत्वाचा नाजूक विषय आहे? एक आईच असते जी पुरूषाला जन्म देते. तीच्या भावभावना या अथांग समुद्रा सारख्या असतात.. त्यातलं ओंजळभर पाणी या सिनेमाच्या निमित्ताने रसिकांच्या चरणी वहाणार आहे. हा सिनेमा फक्त कुणा स्त्रीसाठी नाही.. तर तो समस्त रसिकांसाठी असेल. कारण प्रत्येकाला आई असते. आईपण भारी देवा सोबत, आम्ही पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा आणि चिरस्थायी प्रभाव टाकणारा चित्रपट देऊ अशी आशा करतो.”
 
हे वाचलंत का? - राजकीय नाटकं सुरु मात्र रंगभूमीवरील नाटकांना मनाई : केदार शिंदे  
 
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित, ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि अजित भुरे यांची सह-निर्मीती असलेल्या ‘आईपण भारी देवा’ चित्रपटाचे लेखन वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांच्याद्वारे करण्यात आले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121