मुंबई: मोटोरोला प्रेमींसाठी एक गुड न्यूज आहे. भारतात ३ एप्रिल रोजी मोटोरोला एज ५० प्रो बाजारात दाखल होणार आहे.गेल्या काही वर्षांत मोटोरोला कंपनीचे अनेक मोबाईल बाजारात आले नसले तरी कंपनीने भारतात पुनरागमन करायचे ठरवले आहे. त्यातील पुढचा टप्पा म्हणून स्नॅपड्रॅगन ७ जनरेशन ३ १२५ वॉल्टचा वायर चार्जर, ५० वॉल्टचे वायरलेस चार्जिंग,५० मेगापिक्सल कॅमेरा, १४४ हर्टज पोलेड (poLED) डिस्प्ले, ५० मेगापिक्सल कॅमेरा, ६.७ इंच स्क्रिन अशा आकर्षक वैविध्यपूर्ण फिचर्ससह बाजारात दाखल होणार आहे.
हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे. याशिवाय कंपनीकडून ३ वर्षांची ओएस अपडेट देण्यात येणार असून अँड्रॉइड १४ आवृत्तीवर नवीन स्मार्टफोन चालणार आहे. कंपनीकडून बजेट मोबाइल सोबतच फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये लक्ष केंद्रित करण्याचे लक्ष दिसून येत आहे. यासाठी कंपनीने हा नवीन स्मार्टफोन बाजारात आणायचे ठरविले. यासंबंधी त्याचा टिजर कंपनीकडून एक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता.
कंपनीकडूनही हा स्मार्टफोन येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. लेनोवो कंपनीच्या मालकीची मोटोरोला आशियाई बाजारात हातपाय पसरत असल्याचे चित्र पहायला मिळाले होते.फ्लिपकार्ट व्यतिरिक्त ऑफलाईन बाजारात देखील हा फोन उपलब्ध असणार आहे. फोन बरोबरच ६८ वॉल्टचा चार्जर मिळणार आहे. कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार या फोनमध्ये जनरेटिव एक आय चा वापर देखील होऊ शकतो.
मोटोरोला एज प्रो ५० ची किंमत ३५००० हून कमी असण्याची दाट शक्यता बोलली जात आहे.याआधीचा मोटोरोला एज ४० निओ कंपनीने २२९९९ रुपयाला लाँच केला होता.