इन्शुरन्स कंपनीत प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याची मोठी संधी!, इतक्या जागांकरिता अर्जप्रक्रिया सुरू

    23-Mar-2024
Total Views | 63
ORIENTAL INSURANCE COMPANY LIMITED


मुंबई :    'ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' अंतर्गत नोकरची मोठी संधी निर्माण झाली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १०० रिक्त पदांकरिता भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दि. २१ मार्च २०२४ पासून अर्ज स्वीकृतीस सुरूवात झाली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत भरतीकरिता इच्छुक उमेदवारांकरिता अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि अर्जाची अंतिम तारीख याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

प्रशासकीय अधिकारी

(एकूण १०० रिक्त जागा)


शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर


वयोमर्यादा -

२१- ३० वर्षे


वेतनश्रेणी -

५०,९२५ रुपये



अर्ज शुल्क -

एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता २५० रुपये

तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १००० रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.


अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १२ एप्रिल २०२४ असेल.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121