मुंबई: शपूरजी पालोनजी सरकारी मालकी असलेली पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनशी चर्चेत असल्याचे वृत्त ब्लूमबर्गने वृत्तसंस्थेने दिले आहे.शपूलजी पालोनजी समूह २०००० कोटी रूपयांचा निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
सुत्रांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडे १५००० कोटींचा प्रस्ताव उद्योगपती शपूरजी मिस्त्री यांनी ठेवला आहे. यासंबंधीत अधिक माहिती माध्यमांना मिळालेली नाही. या निधी संकलनासाठी रुपी बाँडच्या माध्यमातून थकीत देये चुकवण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येऊ शकतो.
तीन वर्षांपूर्वी शपोरजी पलोनजीने टाटा सन्समधील समभागांच्या बदल्यात कर्ज घेतले होते. शपूरजी पालोनजींचे टाटा सन्स कंपनीत ९.१ टक्के हिस्सा आहे. मात्र या अपडेट बद्दल पलोनजी समूहाकडून कुठलीही प्रतिक्रिया येऊ शकली नाही.