आज निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.५७ अंशाने वधारत १३९७६.९५ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी स्मॉलकॅप हा ०.७८ अंशाने वाढत ७४३७.६० पातळीवर पोहोचला आहे. सेक्टोरल इंडायसेस (क्षेत्रीय निर्देशांक) देखील मोठ्या दिमाखात वाढले आहे. बँक, ऑटो, फायनान्सशियल सर्विसेस, एफएमसीजी, आयटी, मिडिया, मेटल, फार्मा, पीएसयु बँक, कनज्यूमर ड्युरेबल्स, तेल गॅस, रियल्टी अशा सगळ्याच निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः दोन दिवस मागे पडलेला मिडिया निर्देशांकांने पुनरागमन करत १.७५ टक्क्याने वाढत २०५५.२५ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी मेटल निर्देशांकात १.५८ टक्क्याने वाढत ८३३७.८० पातळीवर पोहोचला आहे. याखेरीज रियल्टी निर्देशांकात ०.९६ अंशाने वाढत ९२५.९५ पातळीवर पोहोचले व कनज्यूमर ड्युरेबल्स १.१६ टक्क्याने वाढत ३२९७१.९० पातळीवर, पीएसयु बँक ०.५७ पातळीवर व निफ्टी फायनांशियल सर्विसेस ०.००३ टक्क्याने वाढत २०८४८.२५ पातळीवर पोहोचले आहे. निफ्टीतील एकूण ३५ कंपन्यांचे समभाग (शेअर्स) मूल्य वधारले असून मात्र १४ कंपन्यांच्या समभागाला गुंतवणूकदारांनी नाकारले आहे. आज विशेष सत्रात सर्वाधिक निफ्टी पातळी २२४१९.५५ पातळीवर पोहोचले होते.
झालेल्या वाढीचा फायदा कंपन्यांना झाला असून निफ्टीवरील संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार, कंपन्यांचे एकूण बाजार भांडवलीकरण (मार्केट कॅपिटलायझेशन) ३९०.६९ कोटीवर पोहोचले आहे.युएस एक डॉलर तुलनेत आज भारतीय रूपया ८२.९१ पर्यंत गेला होता. निफ्टीवर टाटा स्टील, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, अदानी पोर्टस, जेएसडब्लू या समभागात वाढ झाली असून दुसरीकडे एम अँड एम, मारुती, एनटीपीसी, सन फार्मा, नेसले इंडिया या समभागात मात्र घसरण झाली आहे.
बीएससीवर बाजार बंद होताना सेन्सेक्स ७३८०६.१५ पातळीवर बंद झाला आहे. आज या विशेष सत्रात सेन्सेक्सचा उच्चांक दुपारच्या सुरूवातीला ७३९९८.४६ पातळीवर पोहोचला होता. सेन्सेक्स बँक निर्देशांकात अखेरीस २३.८७ अंशाने कमी होत ५३७३१.३९ पातळीवर पोहोचले आहे. मात्र सेन्सेक्स ५०,३५.२२ अंशाने वाढत २३४७७.०७ पातळीवर व सेन्सेक्स तब्बल ६०.८० ने वाढून ७३८०६.१५ पातळीवर पोहोचला. बीएससीत टाटा स्टील, टाटा मोटर्स, जेएसडब्लू स्टील, विप्रो, आयटीसी, एशियन पेटंस, बजाज फायनान्स, टीसीएस या समभागात तेजी आली असून एचडीएफसी बँक, कोटक बँक, एक्सिस बँक,आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी या समभागात (शेअर्समध्ये) नुकसान झाले आहे.
सुरूवातीला वाढलेला वेग काही काळासाठी मंदावला असतानाच अखेरीस शेअर बाजारात समभाग मूल्य मोठ्या पातळीवर बंद झाले. कमोडिटी एमसीएक्स निर्देशांकात देखील वाढ होत १ बँरेल मागे बाजारमूल्य ६६०२.० पातळीवर पोहोचले म्हणजेच १५० अंशाने क्रुड तेल निर्देशांकात वाढ झाली आहे. भारतीय रुपयात कुठलाही विश् बदल झालेला नाही हे दिसून आले. ५२ आठवड्यात २२९ समभागात वाढ झाली असून १८ समभागांनी ५२ आठवड्यातील ' लो ' ची नोंदणी केली. पुढील आठवड्यात तीन आयपीओ बाजारात येत असल्यामुळे गुंतवणूकदारंकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बाजारातील स्थितीविषयी मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना एल के पी सिक्युरिटी लिमिटेडचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, ' बँक निफ्टी दिवसभर कमी सहभागाने श्रेणीबद्ध राहिला. तरीसुद्धा, एकूण भावना जोपर्यंत ४२००० च्या वर राहते तोपर्यंत सकारात्मक राहते. ४७५०० वरील निर्णायक प्रगती निर्देशांकांला ४८२०० च्या दिशेने नेण्याची शक्यता आहे.
निफ्टीची सुरुवात सकारात्मक पातळीवर झाली परंतु उच्च पातळीवरील विक्रीच्या दबावाला तोंड देण्यासाठी समभागाने संघर्ष करून दिवसाच्या शेवटी सर्वात कमी पातळीवर बंद झाला. एकूण भावना सकारात्मक राहिल्या तरी, नवीन रॅली ट्रिगर करण्यासाठी निर्देशांकाने २२४०० चा अंक ओलांडला पाहिजे. एक निर्णायक प्रगती २२४०० वरील निर्देशांक २२६०० कडे नेऊ शकतो.'