मुंबई: शुक्रवारी एमएसएमई उद्योजक नोंदणीला 'उद्यम' ला भरभरून रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळाला आहे. उद्यम असिस्ट प्लॅटफॉर्म (UAP) वर ४ कोटींहून अधिक एमएसएमई (MSME) उद्योजकांचे नोंदणीकृत लिस्टिंग झाले आहे. लघू सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकाराला हा बंपर प्रतिसाद जनमानसातून मिळाला आहे.
अधिकृत संकेतस्थळवरील माहितीनुसार, ४ कोटी ४२ हजारहून अधिक सदस्यांनी नोंदणी केली आहे. यातील विभागवारीनुसार छोटे उद्योग ६.८ लाख, ३.९३ लाख सूक्ष्म व ५५४८८ मध्यम उद्योगांची नोंदणी केली गेली होती. हा गेल्या पाच महिन्यातील आकडा असुन त्यापूर्वी ऑक्टोबरपर्यंत तीन कोटी उद्योगांची नोंदणी झाली होती. यातील उद्योगांना प्रोत्साहन देत जीएसटी (Goods and Service Tax) मधून या उद्योगांना सूट मिळते.कर्ज मिळवण्यासाठी या क्षेत्राला ' प्राधान्यक्रम' दर्जा मिळाला होता.
उद्योगाची त्या उत्पादन क्षमतेबरोबर अनेक निकषांवर त्या उदयोगाची लघू, सूक्ष्म, मध्यम अशी वर्गवारी पोर्टलकडून करण्यात येते. या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी एमएसएमई (MSME) मंत्रालयातील राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, १ जुलै रोजी सरकारचे उद्यम नोंदणी पोर्टल सुरू झाल्यापासून बंद झालेल्या एमएसएमईची संख्या, २०२० कोविड काळानंतर ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३५६८० वर पोहोचला आहे.