मुंबई:आदित्य बिर्ला कॅपिटल संचालक मंडळांने अखेर आदित्य बिर्ला फायनान्स व आदित्य बिर्ला कॅपिटल यांच्या एकत्रीकरणाला मान्यता दिली आहे.दोन्ही कंपन्या एकत्र होणार असून त्यामुळे एक मोठी एनबीएफसी (विना बँकिंग आर्थिक संस्था) तयार होणार आहे. प्रस्तावित सुचीनुसार विशाखा मुळ्ये या नव्या आस्थापनेच्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत.आरबीआयच्या नियमावलीप्रमाणे कंपनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनी नोंदणीकृत करावी लागणार आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटल ही आदित्य बिर्ला समुहाची आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी आहे. व आदित्य बिर्ला फायनान्स ही पूर्ण वेळ विना डिपॉझिट सेवा पुरवणारी आर्थिक संस्था (NBFC) कंपनी आहे. दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने कंपनीच्या मूल्यावर याचा सकारात्मक परिणाम होऊन व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी या एकत्रीकरणाचा फायदा होऊ शकतो.
कंपनीने निवेदनात म्हटल्यानुसार विना दिक्कत व्यवसाय करण्यासाठी याचा फायदा होणार असून आस्थापनेवरील खर्च व कायदा तसेच प्रशासकीय बाबतीत अनुपालनाचा (Compliance) तिढा उलगडला जाईल.
जानेवारी ३१, २०२३ पर्यंत आदित्य बिर्ला कॅपिटल समुहाकडील असेट अंडर मॅनेजमेंट (व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता) ही ४.१ लाख कोटी रुपये इतके आहे. दुरदृष्टीने कंपनीने भविष्यातील कंपनीच्या वाढीसाठी हा निर्णय घेतला आहे.