मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल आठवडाभरात; ९५ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

    06-Feb-2024
Total Views |
State Commission for Backward Classes Survey

मुंबई :
मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने सुरू केलेल्या सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, ९५ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या माध्यमातून तब्बल १ हजार जीबीचा डेटा संकलित झाला आहे.

२३ जानेवारी २०२४ पासून राज्य मागासवर्ग आयोगाने गोखले इनस्टिट्यूटच्या सहकार्याने हे काम हाती घेतले होते. या सर्वेक्षणात एकूण २ कोटी ४८ लाख २४ हजार १५१ कुटुंबांचे सर्वेक्षण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १ हजार जीबीचा डेटा संकलित झाला.

त्याचे विश्लेषण केल्यावर आठवड्याभराने गोखले इनस्टिट्यूट मागासवर्ग आयोगाला मराठा सर्वेक्षणासंबंधीचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. या सर्वेक्षणातून मराठा समाजाची एकूण लोकसंख्या, तसेच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती समजण्यास मदत होणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
म्हाडा नियुक्त विकासकच करणार मोतीलाल नगरचा पुनर्विकास मुंबई उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

म्हाडा नियुक्त विकासकच करणार मोतीलाल नगरचा पुनर्विकास मुंबई उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर पुनर्विकासाला परवानगी गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर नावाच्या म्हाडाच्या १४१ एकर जमिनीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवार, दि.२५ रोजी विकासक नियुक्तीबाबत पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. मुंबई उपनगरतील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प म्हणून ओळखला जाणाऱ्या या प्रकल्पात म्हाडाने काही दिवसांपूर्वीच प्रकल्प सल्लागार आणि विकास संस्था (सीडीए) म्हणून अदानी रिअॅल्टीची नियुक्ती केली...

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमा संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच!

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमा संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच!

गेले तीन दिवस थायलंड आणि कंबोडिया यांच्यात संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर प्रथम गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. या संघर्षात आतापर्यंत किमान ३० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात सैनिकांसह नागरिकांचाही समावेश आहे. एक लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. ही संघर्षमय परिस्थिती २४ जुलैपासून सुरु झाली. मिसाईल्स, तोफगोळे यांबरोबरच थायलंडने F‑16 विमानातून हल्लेही केले. या संघर्षाची भूमिका पारंपारिक सीमावादावर आधारित आहे. १९०७ च्या फ्रेंच नकाश्यामधील विभागणीवरून हा वाद भडकला आहे. १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121