मुंबई : राहूल गांधीचे हे विधान म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. आधीच जातनिहाय जनगणना न करणे ही माझी चूक होती, अशी कबुली काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिली आहे. यावर केशव उपाध्येंनी त्याच्यावर निशाणा साधला.
आपल्या 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, "राहूल गांधी असो की, नेहरू, काँग्रेस पक्षातील गांधी नेहरू घराण्याने कायमच ओबीसी-दलित यांना विरोध केला आहे. पंडीत नेहरू यांनी दोन वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करून त्यांना लोकसभेत येऊ दिले नाही."
काँग्रेसचा मंडल आयोगाला विरोध! "इंदिरा गांधी यांनी जगजीवनराम यांना बळीचा बकरा केला. काँग्रेसनेच मंडल आयोगाला विरोध केला. सोनिया गांधींना अध्यक्ष करण्यासाठी सिताराम केसरींना अंत्यत वाईट पध्दतीने अपमानित करण्यात आले. २०१० मध्ये जातनिहाय जनगणना करायला मनमोहन सिंग यांनी तयारी दाखवली, पण काँग्रेसचेच नेते चिदंबरम यांनी जातनिहाय जनगणना शक्य नसल्याचे सांगितले," अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.