मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. 'फसवणूक नको आरक्षण द्या', 'महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर' अशा घोषणा देत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
विधानसभा आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, नितीन राऊत, अमीन पटेल, अमित देशमुख, धीरज देशमुख, जितेश अंतापुरकर, भाई जगताप, राजेश राठोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, राजन साळवी, नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) अनिल देशमुख, सुनील भुसारा , विनोद निकोले यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली.