अर्थसंकल्पीय अधिवेशनात ८ हजार ६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर!

अंतरिम अर्थसंकल्प; शेतकऱ्यांच्या भरपाईकरिता सर्वाधिक तरतूद

    26-Feb-2024
Total Views | 59

Ajit Pawar


मुंबई :
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २६ फेब्रुवारी पासून सुरू झाले. पहिल्या दिवशी ८ हजार ६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडल्या. २७ फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. त्यानंतर दुपारी दोन वाजता सन २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल.
 
८ हजार ६०९.१७ कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी ५ हजार ६६५.४८ कोटींच्या अनिवार्य, २ हजार ९४६.६९ कोटींच्या मागण्या या विविध उपक्रमांतर्गत आणि १७ कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आहेत. ८ हजार ६०९.१७ कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ६ हजार ५९१.४५ कोटी इतका आहे. हा निव्वळ भार सहन करण्यासाठी कोणतीही अतिरिक्त साधनसंपत्ती तूर्तास उपलब्ध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
कोणत्या विभागाला किती रक्कम? (कोटींमध्ये)
 
वित्त विभाग - १८७१.६३
महसूल व वन विभाग - १७९८.५८
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग - १३७७.४९
विधि व न्याय विभाग - १३२८.८७
नगर विकास विभाग - ११७६.४२
नियोजन विभाग - ४७६.२७
गृह विभाग - २७८.८४
कृषी व पदुम विभाग - २०४.७६
सार्वजनिक बांधकाम विभाग - ९५.४८
 
महत्त्वाच्या पुरवणी मागण्या!
 
१) अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे बाधित पिकांच्या नुकसानीकरीता - २,२१०.३० कोटी
२) महावितरण कंपनीच्या कृषिपंप, यंत्रमाग व वस्त्रोद्योग ग्राहकांना शासनाकडून अनुदान - २,०३१.१५ कोटी
३) राष्ट्रीय आवास बँकेकडून नागरी पायाभूत विकास निधी अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्ज - २०१९.२८ कोटी
४) मुंबई मेट्रो लाईन ३, नागपूर मेट्रो लाईन व पुणे मेट्रो लाईन यांच्या कर्जाच्या थकबाकीची परतफेड - १,४३८.७८ कोटी
५) न्यायिक अधिकाऱ्यांना रेड्डी आयोग शिफारशीनुसार विविध भत्यांची थकबाकी - १,३२८.३३ कोटी
६) महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींच्या क्षेत्रात पायाभूत सोयीच्या विकासासाठी - ८०० कोटी

अग्रलेख
जरुर वाचा
रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवार, दि.२७ रोजी गुजरातमधील वडोदरा येथील सावली येथे असलेल्या अल्स्टॉम या रेल्वेनिर्मिती कारखान्याला भेट दिली. यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत वडोदरा खासदार डॉ. हेमांग जोशी, सावलीचे आमदार केतनभाई इनामदार, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, वडोदरा आणि अहमदाबादचे डीआरएम आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी होते. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या अल्स्टॉमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे ..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या २.२५ कोटी लाभार्थ्यांना जूनचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे.मात्र २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहेत. य.ाअपात्र लाभार्थ्यांपैकी काहीजण एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहेत. तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत,तसेच ही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सर्व २६.३४ लाख अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेअ..

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121